CoronaVirus...keep the window slightly open; Government appeal on AC hrb
...बस खिडकी थोडीशी उघडी ठेवा; कोरोनाला संपवण्यासाठी सरकारचे आवाहन By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 9:55 AM1 / 11कोरोना व्हायरस एवढ्या तापमानात, तेवढ्या तापमानात मरतो-जगतो अशा अनेक सूचना लोकांमध्ये अस्वस्थता वाढवत आहेत. यामुळे भारत सरकारने एक गाईडलाईन जारी केली आहे. तुम्हाला एसी लावायचा असेल तर लावा, पंखा लावा; पण खिडकी थोडी उघडी ठेवा, असे आवाहन केले आहे. 2 / 11खिडकी उघडी ठेवल्यास खेळत्या हवेद्वारे कोरोनाचे संक्रमण रोखता येऊ शकते. ऑफिस, हॉस्पिटल आणि मोठ्या सेटअपच्या जागांमध्ये आतील अशुद्ध हवा बाहेर जाण्यासाठी आणि बाहेरील शुद्ध हवा आत येण्यासाठी व्यवस्था करण्यासही यामध्ये सांगण्यात आले आहे. 3 / 11ही मार्गदर्शक सूचना भारताची हिटींग, रेफ्रिजरेटिंग आणि एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स सोसायटी (आयशेयर) च्या मदतीने तयार करण्यात आली आहे. 4 / 11१९८१ मध्ये या सोसायटीची स्थापना झाली होती. ही सोसायटी ४१ शहरामध्ये काम करत असून २९ हजार इंजिनिअर याच्याशी जोडलेले आहेत. 5 / 11आयशेयरने चीनच्या १०० शहरांमध्ये झालेल्या अभ्यासावरून सांगितले आहे की, अधिक तापमान असल्यास हवेद्वारे संक्रमन घटू शकते. हवेद्वारे कोरोनाचा प्रसार न होण्यासाठी हवा खेळती राहणे गरजेचे आहे. 6 / 11सर्वाधिक प्रसार : आयशेअरनुसार ७-८ डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हवेद्वारे अधिक प्रसार होतो. ४ डिग्रीला कोरोना १४ दिवसांपर्यंत जिवंत राहतो. 7 / 11मध्यम प्रसार : 20-24 डिग्रीवर कोरोना व्हायरसचा प्रसार कमी होऊ लागतो. ३० डिग्रीला आणखी कमी होतो. 37 डिग्री च्या तापमानाला व्हायरस एक दिवस जिवंत राहतो. 8 / 11सर्वात कमी : तापमान ५६ डिग्री असेल तर हा व्हाय़रस ३० मिनिटेच जिवंत राहतो. उष्णता वाढल्यास प्रसाराचा वेग खूप कमी होणार आहे. 9 / 11खोलीमध्ये एसी वापरत असाल तर तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सिअस ठेवावे. जर गरम होत असल्यास पंखा लावला तरी चालेल. मात्र, खिडकी थोडी उघडी ठेवावी. हवा आत-बाहेर खेळती राहिल. 10 / 11कूलरला बाहेरची ताजी हवा मिळत राहिल हे पहावे. उरलेले पाणी फेकून द्यावे. खिडकी उघडी ठेवावी. 11 / 11पंखा सुरु असेल तर एकस्झॉस्ट फॅनही लावा, खोलीतील व्हेंटिलेशन सुरु राहिल. आणखी वाचा Subscribe to Notifications