शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus कोरोनाची मजल पुढच्या सूर्य ग्रहणापर्यंतच; काशीच्या ज्योतिषाचार्यांचे मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 11:49 AM

1 / 10
ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला शनी देव जन्माला आले होते. यामुळे हा दिवस शनी जयंती म्हणून साजरा केला जातो. यादिवशी शनीची पूजा केली जाते. आज जयंतीदिनी काशीच्या ज्योतिषांनी तब्बल ९७२ वर्षांनी बनलेल्या विशेष योगायोगबाबत सांगितले आहे.
2 / 10
या ज्योतिषांनी कोरोनाच्या संक्रमण काळाचीही भविष्यवाणी केली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार शनी जयंतीच्या दिवशी चार ग्रह एकाच राशीमध्ये राहणार आहेत. या योगामुळे २२ मे नंतर कोरोनाची महामारी शक्तीहीन होत जाणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.
3 / 10
एकीकडे कोरोनावर औषधे शोधण्याचे काम सुरु आहे. काही ठिकाणी अंतिम टप्प्यात असल्याचेही दावे केले जात आहेत. यामुळे या पार्श्वभूमीवर ही भविष्यवाणी महत्वाची मानली जात आहे.
4 / 10
ज्योतिषाचार्य आणि काशी विद्वत परिषदेचे संगठन मंत्री पंडीत दीपक मालवीन यांना सांगितले की, ज्योतिष शास्त्रानुसार २२ मे रोजी होणारा शनी जयंतीवेळचा संयोग कोरोनासारख्या महामारीला हरविण्यासाठी उपयुक्त ठरेल. शनी जयंतीनंतर कोरोनाच्या उद्रेकामध्ये कमी येण्याची शक्यता आहे.
5 / 10
मालवीन यांनी सांगितले की, कोणत्याही व्याधीचे संक्रमणचा कालावधी एक ग्रहण ते दुसरे ग्रहण असा असतो. यामुळे कोरोनाचे संक्रमण गेल्या वर्षी झालेल्या २६ डिसेंबरच्या सूर्य ग्रहणापासून सुरु झाले होते. आता २१ जूनला पुढील सूर्य ग्रहण आहे. यामुळे कोरोनाचे संकट या ग्रहणापर्यंच राहणार आहे.
6 / 10
आज २२ मे रोजी ज्येष्ठ कृष्ण अमावास्येला मोठा योग जुळून आला आहे. शनी पाप ग्रह, न्यायाची देवता आणि क्रूरही आहे. ज्या लोकांवर शनीची साडेसाती आणि महादशा आहे, त्यांच्यासाठी हा एक सुवर्ण योग आहे.
7 / 10
आजच्या दिवशी हा योग जुळून येत असल्याने शनी देवाची पूजा, आराधना केल्यास साडेसाती, महादशेपासून मुक्ती मिळू शकते, असे मालवीन यांनी सांगितले.
8 / 10
आजच्या दिवशी ९७२ वर्षांनी शनी जयंतीला चार ग्रह एकाच राशीमध्ये आले आहेत. सूर्य, चंद्र, बुध आणि शुक्र एकत्र वृश्चिक राशीमध्ये राहणार आहेत.
9 / 10
अशा प्रकारचा योग १०४८ मध्ये जुळून आला होता. आता पुढील योगायोग पाचशे वर्षांनी होणार आहे. या विशेष संयोगावर शनी देवांची उपासना, आराधना आणि त्यांच्या सामुग्रीचे दान करण्याने अधिक फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
10 / 10
जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 51,19, 041 वर गेली असून 3,30,400 लाख लोकांचा बळी गेला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAstrologyफलज्योतिष