Covaxin Vs Covishield: The reasons Covaxin and Covishield differ from each other are as follows
Covaxin Vs Covishield: या कारणांमुळे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड आहेत एकमेकांपेक्षा वेगळ्या, अशी आहेत वैशिष्ट्ये By बाळकृष्ण परब | Published: January 06, 2021 2:28 PM1 / 8भारतात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच आता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालिन वापरास मान्यता देण्यात आली आहे. या दोन्ही लसी कोरोनाविरोधात प्रभावी असल्या तरी अनेकबाबतीत एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. आज जाणून घेऊया दोन्ही लसींच्या वैशिष्ट्यांविषयी. 2 / 8कोव्हॅक्सिन - कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेकने आयसीएमआर आणि पुण्यामधील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीसोबत मिळून विकसित केली आहे. 3 / 8व्हॅक्सिन प्लॅटफॉर्म - कोव्हॅक्सिन इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन आहे. आजार पसरवणाऱ्या विषाणूला निष्क्रिय करून ही व्हॅक्सिन विकसित करण्यात आली आहे. 4 / 8चाचणी - प्राण्यांमध्ये झालेल्या चाचण्यांशिवाय कोव्हॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये 800 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. तर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही 26 हजार जणांवर करण्यात आली होती. 5 / 8चाचणीचे निष्कर्ष - कोव्हॅक्सिनचा एफिकेसी डेटा आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा एफिकेसी डेटा हा मार्चच्या अखेरीपर्यंत प्रसिद्ध होईल, त्यानंतर त्याची रेग्युलेटरी मंजुरी घेतली जाईल. तसेच कंपनी याची चौथ्या टप्प्यातील चाचणीही सुरू ठेवणार आहे. ज्यामध्ये काही वर्षांपर्यंत स्वयंसेवकांवर देखरेख ठेवली जाईल. 6 / 8कोविशिल्ड - कोविशिल्ड लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने ब्रिटिश-स्वीडिश कंपनीने एस्ट्राजेनेकासोबत मिळून विकसित केली आहे. भारतामध्ये सीरम इन्स्टिट्युट याचे उत्पादन करत आहे. 7 / 8 व्हॅक्सिन प्लॅटफॉर्म - कोविशिल्ड ही लस चिम्पान्झी एडेनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित लस आहे. यामध्ये चिम्पान्झीला संक्रमित करणाऱ्या विषाणूला अनुवांशिकरीत्या संशोधित करण्यात आले आहे ज्यामुळे हा विषाणू शरीरात पसरत नाही. या संशोधित विषाणूमधील एक भाग कोरोना विषाणूचा आहे. ज्याला स्पाइक प्रोटिन म्हटले जाते. ही लस शरीरामध्ये इम्युन रिस्पॉन्स तयार करतो. तो स्पाइक प्रोटिनवर काम करतो. ही लस अँटिबॉडी आणि मेमरी सेल्स विकसित करते. ज्यामुळे कोविड-19 ला ओळखण्यात मदत मिळते. 8 / 8चाचणी - सीरम इन्स्टिट्युटने 23 हजार 745 पेक्षा अधिक स्वयंसेवकांवर पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी केली आहे. याच्या निष्कर्षांमध्ये 70.42 टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे. याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 1600 जणांवर आतापर्यंत चालू आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications