शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : बापरे! अँटीबॉडीजलाही चकवा देतोय कोरोनाचा 'हा' खतरनाक व्हेरिएंट; 'हे' लक्षण दिसताच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 3:53 PM

1 / 14
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,935 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 14
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,25,760 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे आणि कोविड-19 चे नवीन प्रकार समोर येत आहेत.
3 / 14
ओमायक्रॉनचा नवीन सब-व्हेरिएंट BA.5 कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमागे जबाबदार आहे. तज्ञांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे कारण तो वेगाने संक्रमित होतो आणि अँटीबॉडीजला देखील चकवा देतो.
4 / 14
ओमायक्रॉनचे सब-व्हेरिएंट BA.5 हा आधीही कोविड-19 ची लागण झालेल्या लोकांना संक्रमित करू शकतो. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
5 / 14
BA.5 लोकांना झपाट्याने संक्रमित करत आहे. मेयो क्लिनिकने एका रिपोर्ट म्हटले आहे की नवीन स्ट्रेन 'हायपरकॉन्टेजियस' आहे आणि रुग्णाला हॉस्पिटल आणि आयसीयूमध्ये नेण्याची परिस्थिती निर्माण होते.
6 / 14
लसीकरण न केलेल्या लोकांमध्ये व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता लसीकरण केलेल्या लोकांपेक्षा पाच पटीने जास्त असते आणि रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 7.5 पट जास्त असते आणि मृत्यूची शक्यता 14 ते 15 पट जास्त असते.
7 / 14
ओमायक्रॉनचे नवीन सब व्हेरिएंट BA.5 देखील मागील व्हेरिएंट्सप्रमाणेच आहे. त्याची लक्षणे कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटसारखी घातक नाहीत, परंतु काही गंभीर प्रकरणांमध्ये वेदनादायक लक्षणे जाणवू शकतात. BA.5 चे सर्वात मोठं लक्षण म्हणजे घसा खवखवणे.
8 / 14
युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडोच्या तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या इतर सब-व्हेरिएंटप्रमाणे, BA.5 सब-व्हेरिएंटचाही श्वसनमार्गावर परिणाम होतो आणि लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. घसा खवखवणे हे लक्षण आहे.
9 / 14
घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं झाल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 14
कोरोना व्हायरसचा अभ्यास करणार्‍या संशोधकांच्या टीमला असे आढळून आले आहे की, 2019 च्या अखेरीस दिसलेल्या SARS-CoV-2 विषाणूचे स्वरूप आता अनेक प्रकारे बदलले आहे. कोरोना विषाणू आता पूर्वीपेक्षा अधिक संक्रमक झाला आहे.
11 / 14
कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांतील रिसर्चमध्ये कोरोना व्हायरस पृष्ठभागावर केवळ काही मिनिटे टिकून राहू शकतो असं म्हटलं होतं तर दुसरी लाट येईपर्यंत, व्हायरस हवेत राहू शकतो की नाही? याची पुष्टी झालेली नव्हती.
12 / 14
म्युटेशननंतर उदयास आलेल्या व्हेरिएंटबद्दल शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, काही परिस्थितींमध्ये कोरोना अनेक गोष्टींवर 30 दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतो, याशिवाय हवेतील व्हायरसमुळे घरातील संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे कोरोनाला हलके घेण्याची चूक महागात पडू शकते.
13 / 14
कोरोना व्हायरसच्या स्वरूपातील बदलामुळे त्याचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोकाही वाढत आहे. आतापर्यंत, अभ्यासात असे मानले जात होते की एकदा संसर्ग बरा झाल्यानंतर 12 आठवड्यांपर्यंत पुन्हा संसर्ग होण्याचा धोका नाही.
14 / 14
अलीकडील रिसर्चमध्ये संशोधकांनी असे म्हटले आहे की नवीन व्हेरिएंट्समुळे हा कालावधी आता 28 दिवसांवरून कमी झाला आहे. म्हणजेच जर तुम्हाला एकदा संसर्ग झाला असेल तरी महिन्याभरात तुम्ही पुन्हा व्हायरसला बळी पडू शकता.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन