शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona XE Variant Symptoms : धोका वाढला! कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE ची दहशत; 'ही' आहेत लक्षणं, रिपोर्टमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 8:35 AM

1 / 14
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 49 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 495,358,778 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 6,191,425 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 14
जगभरातील 430,697,317 लोक उपचारानंतर कोरोनातून बरे झाले आहेत. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
3 / 14
गेली दोन वर्षे कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. पण याच दरम्यान नववनीन व्हेरिएंट येत आहे. काही दिवसांपूर्वी डेल्टा आला त्यानंतर ओमायक्रॉन, BA.2 आणि आता XE व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे.
4 / 14
जागतिक आरोग्य संघटनेने या नव्या व्हेरिएंटबाबत माहिती दिली आहे. मात्र याच दरम्यान XE आणि कप्पा व्हेरिएंटची एक केस मुंबईत सापडल्याची माहिती समोर आली. पण आरोग्य मंत्रालयाने हे वृत्त फेटाळून लावलं आहे.
5 / 14
आरोग्य मंत्रालयाने याप्रकरणाचा अधिक तपास करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. डेटानुसार, कोरोनाचा हा नवीन म्यूटेट व्हेरिएंट ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 पेक्षा दहा टक्के अधिक संक्रमक आहे.
6 / 14
कोरोनाची लक्षणं ही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वेळीच लक्षणं ओळखून उपचार करणं गरजेचं आहे. हा व्हेरिएंट नेमका किती खतरनाक आहे हे आताच सांगणं थोडं कठीण आहे.
7 / 14
कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE ची काही लक्षणं आता समोर आली आहेत. यामध्ये ब्रेन फॉग, भीती वाटणे, ताप, हापोक्सिया, झोपेत बडबडणे, हार्ट रेट वाढणं, त्वचेवर रॅशेस येणं, वोकल कार्ड न्यूरोपॅथी यांचा समावेश आहे.
8 / 14
एका रिपोर्टमधून ही लक्षण समोर आली आहेत. जर कोणाला असं काही जाणवलं तर त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. ताप, सतत खोकला, वास न येणं, चव न समजणं ही कोरोनाची लक्षणं आहेत.
9 / 14
कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट ब्रिटनमध्ये सापडला आहे. XE स्ट्रेनने जवळपास 637 लोकांना संक्रमित केलं असून तो वेगाने पसरत आहे. जर सतर्क राहिलं नाही तर तो जगभरात धुमाकूळ घालू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 14
वैज्ञानिकांच्या मते, XE व्हेरिअंट हा इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 10 पट वेगाने पसरू शकतो. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, या व्हेरिअंटला घाबरून जाण्याची गरज नाही. तथापि, या प्रकाराबद्दल अद्याप संपूर्ण माहिती आलेली नाही आणि यावर रिसर्च सुरू आहे, असे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे.
11 / 14
आता जागतिक आरोग्य संघटनेने हे लक्षण गंभीर असल्याचं सांगत इशारा जारी केला आहे. 'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, NHS च्या ताज्या अपडेट केलेल्या यादीतून कोरोना व्हायरसचं एक लक्षण गायब आहे, मात्र WHO ने याबाबत अलर्ट केलं आहे.
12 / 14
अधिकृतपणे सूचीबद्ध नसलेले लक्षण म्हणजे 'भ्रम'. रोग नियंत्रण केंद्र (CDC) आणि WHO या दोन्ही संस्थांनी भ्रम हे कोरोना व्हायरसचे लक्षण म्हणून सूचीबद्ध केले आहे. WHO च्या यादीनुसार, भ्रम हे 'गंभीर लक्षण' म्हणून सूचीबद्ध केलं गेलं आहे.
13 / 14
कोणालाही याचा त्रास होत असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भ्रमाला 'ब्रेन फॉग' असंही म्हटलं जातं. जे दीर्घ कोविडचे लक्षण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्मरणशक्ती किंवा एकाग्रतेमध्ये समस्या येतात तेव्हा त्याला दीर्घ कोविडचे लक्षण म्हणून ओळखलं जातं.
14 / 14
लक्ष नसणे, विचारात अडचण, गोंधळ, विसरणे, मानसिक थकवा जाणवणे ही लाँग कोविडची लक्षणे आहेत. जगभरातील अनेक देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन