Covishield dose gap may again be reduced, but only for people above 45
Covishield Vaccine: कोविशील्डचा डोस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी; मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 4:44 PM1 / 9देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. 2 / 9गेल्या अनेक दिवसांपासून हा आकडा ५० हजारांच्या खाली आला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याची आवश्यकता आहे. 3 / 9लसीकरण अभियानाला गती देण्याची गरज असताना कोविशील्ड लसीबद्दल सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशातील लसीकरण अभियानात सर्वाधिक वापर कोविशील्डचा करण्यात येत आहे.4 / 9कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकार करत आहे. मात्र हा निर्णय ४५ वर्षे आणि त्यावरील व्यक्तींसाठी असेल. मिंटनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 5 / 9कोविशील्डच्या २ डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय २ ते ४ आठवड्यांत घेतला जाऊ शकतो. कोविड-१९ वर्किंग ग्रुपचे चेअरमन डॉ. एन. के. अरोरा यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. 6 / 9सध्याच्या घडीला कोविशील्डच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचं अंतर आहे. भारतात लसीकरण अभियान सुरू झालं, त्यावेळी हे अंतर ४ ते ६ आठवडे होतं. 7 / 9लसीकरण अभियानाला सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांनी कोविशील्डच्या २ डोसमधील अंतर ४ ते ८ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलं. त्यानंतर हाच कालावधी १२ ते १६ आठवड्यांपर्यंत नेण्यात आला. 8 / 9कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याच्या निर्णयावर देशभरातून टीका झाली. सरकारला लसींचा साठा उपलब्ध करून देणं जमत नसल्यानं हा निर्णय घेतला गेल्याचं म्हणत विरोधकांनी सरकारवर शरसंधान साधलं. 9 / 9विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. दोन डोसमधील कालावधी वाढवल्यास अँटिबॉडी अधिक प्रमाणात तयार होत असल्याचं संशोधनातून सिद्ध झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications