1 / 8एकीकडे देश कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असतानाच पूर्व किनारपट्टी अम्फान चक्रिवादळाने हादरली आहे. तब्बल १६५ किमी ताशी वेगाने वाहत असलेल्या वादळी वाऱ्यांनी ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी घडवली आहे. 2 / 8दरम्यान, वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे कोलकाता येथील विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांमुळे विमानतळांवर उभी असलेली मोठी विमानेही हादरत होती. तर मुसळधार पावसामुळे विमानतळ परिसर जलमय झाला होता. अम्फान वादळामुळे झालेल्या नुकसानीचे चित्र छायाचित्रांमधून समोर आले आहे. 3 / 8 दरम्यान, जीव मुठीत धरून या वादळाचा कहर अनुभवणाऱ्या अनेक जणांनी आपण असे चक्रिवादळ आधी कधीच पाहिले नसल्याचे सांगितले. 4 / 8 कोलकाता विमानतळावरील परिसर जलमय झाल्याने विमानतळावर उभी असलेली विमाने समुद्रात तरंगत असल्याचा भास होत होता. 5 / 8सुमारे सहा तास पश्चिम बंगालमध्ये अम्फन चक्रिवादळाचे थैमान सुरू होते. या काळात राज्यामध्ये सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधीची वित्तहानी झाली. तसेच विमानतळावरून आपातकालीन सेवा पुरवत असलेल्या विमानसेवेवरही परिणाम झाला. 6 / 8विमान तळावरील तब्बल ४० टन वजनाची विमानेही वादळामुळे हलत होती. विमानांच्या चाकांना चोक्स लावून जखडून ठेवण्यात आले होते. तरीही ही विमाने हलत होती. 7 / 8 अम्फान चक्रिवादळामुळे पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोलकाता विमानतळाचा बहुतांश भाग पाण्याखाली गेलाच सोबतच वादळी वाऱ्यांमुळे विमानताचेही मोठ्या प्रमाणात नुसकान झाले. 8 / 8 बंगालमधील किनारी भागात या वादळाने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहनांचे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले.