शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cyrus Mistry Death Reason: सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं खरं कारण उघड; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 12:47 PM

1 / 9
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथील सूर्या पुलाजवळ रविवारी झालेल्या अपघातात टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या कासा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांची वापी येथे रवानगी करण्यात आली.
2 / 9
पालघर येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. मिस्त्री यांचा पोस्टमार्टमचा प्राथमिक अहवाल जाहीर झाला आहे. अहवालानुसार, त्याच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची पुष्टी झाली आहे.
3 / 9
याशिवाय शरीराच्या इतर भागांनाही दुखापत झाली आहे. प्राथमिक अहवालानुसार सायरस आणि त्यांचा मित्र जहांगीर यांचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला आहे. त्याचा व्हिसेराही पुढील तपासासाठी जतन करण्यात आला आहे.
4 / 9
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, या अपघातात सायरस मिस्त्री यांच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली आहे. ज्याला वैद्यकीय परिभाषेत 'पॉलीट्रॉमा' म्हणतात. त्यामुळे सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण रस्ता अपघातात चक्काचूर झालेली कार पाहून अंदाज येतो की गाडीचा वेग किती असेल?
5 / 9
मिळालेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक परदेशात राहतात, ते रात्री उशिरा मुंबईत पोहोचतील, त्यामुळे मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अपघातातील तपासात पोलीस एनजीओची मदत घेणार आहेत
6 / 9
सायरस मिस्त्री अपघात प्रकरणाच्या तपासात पालघर पोलीस अपघाताचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या तपासात पोलीस एका एनजीओचीही मदत घेणार आहेत. ही स्वयंसेवी संस्था महामार्गावरील अपघातांचे विश्लेषण आणि अभ्यास करते. यासोबतच भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी प्रशासनासोबत बारकाईने काम करत आहे. एनजीओचे लोक पोलिसांसह तपासात सहभागी होतील.
7 / 9
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री यांच्या रविवारी झालेल्या अपघाताच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि त्यांच्या सहकारी प्रवाशाने सीट बेल्ट घातला नव्हता, त्यांची कार अत्यंत वेगात होती
8 / 9
ड्रायव्हरनं घेतलेल्या चुकीचा निर्णय या अपघातासाठी कारणीभूत ठरला. या आलिशान कारचा वेग इतका होता की तिने पालघर जिल्ह्यातील चारोटी चेकपोस्ट ओलांडल्यानंतर अवघ्या नऊ मिनिटांत २० किमीचे अंतर कापले.
9 / 9
माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. सायरस मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला कारने येत होते. त्यांच्या कारमध्ये एकूण चार जण होते. या वर्षी २८ जून रोजी सायरसचे वडील आणि बिझनेस टायकून पल्लोनजी मिस्त्री (93) यांचे निधन झाले होते.
टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीAccidentअपघात