शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांचा 'दिल्ली दौरा रुबाबात'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 10:44 PM

1 / 12
मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.
2 / 12
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनला भेट दिली. येथील छत्रपती शिवाजी महारांज्या पुतळ्याला वंदन करुन ते पंतप्रधानांच्या भेटीला निघाले
3 / 12
पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
4 / 12
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. जवळपास दीड तास ही बैठक सुरू होती.
5 / 12
मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
6 / 12
'पंतप्रधानांसोबतची भेट औपचारिक स्वरुपाची होती. त्यात मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक चर्चा झाली. मोदींनी संपूर्ण विषय गांभीर्यानं ऐकला.
7 / 12
आम्ही याबद्दल त्यांना विस्तृत पत्रं दिली. ते निश्चितपणे हा प्रश्न सोडवतील,' अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
8 / 12
मराठा आरक्षणासोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल मोदींसोबत चर्चा झाली. ओबीसींच्या राजकीय आरक्षण न्यायालयानं रद्द केलं आहे. हा देशपातळीवरील विषय आहे.
9 / 12
याशिवाय मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा विषयदेखील संवेदनशील आहे. याबद्दलदेखील मोदींसोबत चर्चा झाली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
10 / 12
मोदींसमवेतच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंसोबत अनेकांनी वेगवेगळे कॅप्शन देऊन हे फोटो शेअर केले आहेत.
11 / 12
अजित पवार यांची जोधपुरी ड्रेसमधील कडक एंट्री, मुख्यमंत्र्यांचा शांत अन् संयमीपणा, पण तितकाच रुबाबदार पेहरावही या भेटीतील चर्चेचा विषय ठरला
12 / 12
दिल्ली दरबारी महाराष्ट्र सरकाने ताठ मानेनं आपले प्रश्न मांडले, यावेळी तिन्ही पक्षाच्या सरकारमधील नेत्यांच्या व्हायरल फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यातच, मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रुबाबात पार पडल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली
टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीAjit Pawarअजित पवार