तीन मिनिटांत मृत्यूपत्र बनविता येणार; मध्येच वारसदारही बदलता येणार, UCC चे फायदे एवढे की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:45 IST
1 / 7उत्तराखंडमध्ये युसीसी लागू झाल्याने आता लोकांना घरबसल्या अवघ्या तीन मिनिटांत मृत्यूपत्र करणे सोपे झाले आहे. आपली संपत्ती कोणाला द्यायची हे आपल्या मृत्यूनंतर सांगणारे हे वारसा पत्र आहे. तुम्ही, तुमची संपत्ती आणि दोन साक्षीदार यांचे व्हिडीओ अपलोड केला की मृत्यूपत्र बनून जाणार आहे. 2 / 7हा तीन मिनिटांचा व्हिडीओ असणार आहे. ज्यात तुम्ही तुमच्या संपत्ती कुठे कुठे आहेत, कोणत्या आहेत हे वाचून सांगावे लागणार आहे. यानंतर तुमच्यासोबत असलेले दोन साक्षीदारही त्यात बोलणार आहेत. हा तीन मिनिटांचा व्हिडीओ तुम्हाला युसीसीच्या पोर्टलवर अपलोड करायचा आहे. याचसोबत तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात लिहिलेले मृत्यूपत्र किंवा टाईप केलेले मृत्यूपत्र देखील अपलोड करू शकता. 3 / 7उत्तराखंडच्या नागरिकांना ही सोय उपलब्ध झाली आहे. समान नागरी संहितेत मृत्युपत्र बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी करण्यात आली आहे. UCC च्या कलम ४९ आणि ६० नुसार तुमच्या मालमत्तेची माहिती द्यावी लागते. याचवेळी तुम्हाला तुमच्या मालमत्तेचा कायदेशीर वारसही द्यावा लागतो. 4 / 7हे मृत्यूपत्र बनविण्यासाठी तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त किंवा मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती असावी लागते. ही व्यक्तीच वारसांची यादी जाहीर करू शकते. तुम्ही इतर व्यक्तींना तुमचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे हे सब रजिस्ट्रार प्रमाणित करतो. त्याने जर काही माहिती मागितली तर ती पाच दिवसांत द्यावी लागणार आहे. 5 / 7पत्ता किंवा अन्य काही माहिती बदलायची असेल तर ३० दिवसांचा वेळ दिला जाणार आहे. हे मृत्यूपत्र सेल्फ व्हेरिफाईडही करावे लागणार आहे. त्रयस्थ पार्टीची मदत घेता येणार आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंगपूर्वी आधार नंबरने लॉगिन करावे लागणार आहे. 6 / 7एकदा याद्वारे केलेले मृत्यूपत्र तुम्ही बदलू किंवा रद्द करू शकता. मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर वारसदाराची घोषणा केली जाणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीने मृत्यू पत्र बनविण्यासाठी अर्ज केला असेल आणि त्यावर निर्णय घेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला तर तो अर्जच नोंदणीकृत मृत्यूपत्र मानले जाणार आहे. 7 / 7एकापेक्षा जास्त मृत्यूपत्रे बनविली आणि रद्द केली असतील तर त्यांची नोंद युसीसीकडे असणार आहे. अर्जदार केव्हाही जुने मृत्यूपत्र लागू करू शकणार आहे. नातेसंबंधांत अनेकदा वितुष्ट येते, मुले सांभाळत नाहीत. अशावेळी त्यांनाच वारसदार केले असेल तर तो बदलण्यासाठी ही सोय केलेली आहे.