शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जय हो! भारताचं नवं स्वदेशी महाशस्त्र, रशियाच्या S-400 सारखं एअर डिफेन्स सिस्टम बनवलं; ताकद वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 5:53 PM

1 / 7
भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (DRDO) आज एक अशा एअर डिफेन्स सिस्टमची यशस्वी चाचणी केली की जे देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरला आहे. रशियाच्या एस-४०० सारखीच सिस्टम आता भारतानं तयार केली आहे.
2 / 7
डिफेन्स सिस्टमच्या हिशोबानुसार याची स्पीड देखील उत्तम आहे. यामुळे शत्रुचं यान, विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रोनला घुसखोरीची अजिबात संधी मिळणार नाही.
3 / 7
डीआरडीओनं ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर इंटीग्रेटेड टेस्ट रेंज चांदीपुरवर कमी अंतराच्या हवाई संरक्षण प्रणालीचं (Very Short Range Air Defence System- VSHORADS) यशश्वी प्रेक्षपण केलं. तेही एकदा नव्हे, तर दोनवेळा यशस्वी प्रक्षेपण केलं.
4 / 7
जमीनीवरुन मॅन पोर्टेबल लॉन्चरनं मिसाईल डागण्यात आली. याचा अर्थ असा की अशापद्धतीनं सहजपणे कोणत्याही कमी जागेवरुन मिसाईल डागता येईल. मग चीनच्या सीमेजवळ हिमालयातील पर्वत रांग असो किंवा मग पाकिस्तानच्या सीमेजवळ वाळवंटातून असो. अतिशय कमीत कमी जागेतून शत्रु देशाकडून येणाऱ्या विमान, फायटर जेट, हेलिकॉप्टर, मिसाईल किंवा ड्रोनला पाडता येऊ शकतं.
5 / 7
VSHORADS ही प्रणाली कमी अंतराची इंटरसेप्टर मिसाइल आहे. रशियाच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टमच्या धर्तीवर ती तयारी करण्यात आली आहे. खास गोष्ट अशी की ही हवाई सुरक्षा प्रणाली पूर्णपणे देशात तयार करण्यात आली आहे. डीआरडीओच्या मदतीनं हैदराबाद स्थित रिसर्च सेंटरनं ती तयारी केली आहे.
6 / 7
मिसाईलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ड्युअल बँड IIR सीकर, मिनिएचर रिअॅक्शन कंट्रोल सिस्टम, इंटीग्रेडेट एवियोनिक्स अशा तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. तसंच या सिस्टममध्ये प्रोपल्शन सिस्ट ड्युअल थ्रस्ट सॉलिड मोटर वापरण्यात आली आहे.
7 / 7
VSHORADS चं वजन २०.५ किलोग्रॅम इतकं आहे. याची लांबी जवळपास ६.७ फूट आहे आणि व्यास ३.५ इंचाचा आहे. २ किलो वजनाचं शस्त्र वाहून नेण्याची क्षमता यात आहे. सिस्टमची रेंज २५० मीटर ते ६ किमीपर्यंत आहे. कमाल वेग १.५ मॅक म्हणजेच १८०० किमी प्रतितास इतका आहे. गेल्यावर्षी २७ सप्टेंबर रोजी याची पहिली चाचणी घेण्यात आली आहे.
टॅग्स :Defenceसंरक्षण विभागindian air forceभारतीय हवाई दल