शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Monkeypox Patient in India: ना कुठे गेला, ना कुठून आला! दिल्लीत देशातील चौथा मंकीपॉक्सचा रुग्ण सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 12:36 PM

1 / 7
कोरोनानंतर जगभरात दहशत माजविणाऱ्या मंकीपॉक्सने केरळनंतर आता थेट दिल्लीत धडक मारली आहे. देशातील चौथा रुग्ण सापडला आहे. कोरोनानेदेखील केरळमार्गेच देशात शिरकाव केला होता. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीत जो रुग्ण सापडला आहे तो दिल्लीतलाच आहे. म्हणजे तो परदेशातून किंवा अन्य देशातील राज्यांतून आलेला नाहीय यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
2 / 7
पश्चिमी दिल्लीतील ३२ वर्षीय तरुणाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. त्याची कोणताही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. त्याला ताप आणि त्वचेवर व्रण दिसू लागल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
3 / 7
देशातील हा चौथा रुग्ण आहे. यापूर्वी केरळमध्ये तीन जणांना मंकीपॉक्स झाला आहे. ते परदेशातून आले होते. त्यांच्यावर थिरुवनंतपुरममधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हे तिघे युएई आणि दुबईहून भारतात आले होते.
4 / 7
लक्षणे काय आहेत? ताप येऊन अंगभर पुरळ उठून कालांतराने त्याचे फोडांत रुपांतर होते. अंगदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, अशक्तपणा हेही लक्षणे आहेत. वेळीच उपचार न केल्यास गुंतागुंत वाढत जाते.
5 / 7
फैलाव कसा होतो? मंकीपॉक्सचा विषाणू डबल स्टँडर्ड आहे. संशोधकांच्या मते हा आजार उंदीर, खार, उंदराचे मांस इत्यादींपासून पसरतो.
6 / 7
काय काळजी घ्यावी? मंकीपॉक्स हा आजार साथरोग प्रकारातील असल्याने झपाट्याने फैलावतो. फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणे महत्त्वाचे आहे. मंकीपॉक्सचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने मास्कही लावावा, असा संशोधकांचा सल्ला आहे.
7 / 7
आजार टाळण्यासाठी घर-परिसर स्वच्छ ठेवावा. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
टॅग्स :delhiदिल्ली