Delhi Violence: Not a young BJP supporter of guns, know the truth of viral photos
Delhi Violence: बंदुकधारी तरुण भाजपा समर्थक नाहीच, जाणून घ्या सत्य By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 11:20 AM1 / 12 दिल्लीतील उत्तरपूर्व भागातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या आंदोलनातील एक तरुण चक्क पोलिसावर गोळी चालविण्याची भाषा करताना दिसत आहे. 2 / 12पोलिसा जवानाच्या अंगावर धावून गेलेल्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो सीएएच्या विरोधात प्रदर्शन करणाऱ्या जमावातील आहे. 3 / 12मौजपूर भागात आंदोलनाने हिंसक वळण घेतलेले असताना बंदुकीच्या आठ गोळ्या चालवणाऱ्या तरुणाची ओळख दिल्ली पोलिसांना पटली असुन, तो भाजपा समर्थक नसल्याचे उघड झाले आहे. 4 / 12या तरुणाच्या पाठीमागील जवामाने भगवा रंग्यांचा झेंडा हातात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पण, तो भगव्या रंगाच झेंडा नसून ते प्लॅस्टीक कॅरेट्स आहेत. 5 / 12पोलिसावर बंदुक रोखून धरणारा हा तरुण भाजपाचा कार्यकर्ता असून तो सीएएच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याचं मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, सत्य वेगळंच आहे. 6 / 12बंदुकीधारी तरुणाच्या पाठिमागील जमाव हा सीएए विरोधातील असल्याचे व्हिडीओ चित्रित करणारे पत्रकार सौरभ त्रिवेदी यांनी म्हटले आहे. कारण, हा जमाव जाफराबाद मेट्रो स्टेशनच्या दिशेने आला होता. 7 / 12जमावातील हातात भगव्या रंगाचा झेंडा असून ते भाजपाचे समर्थक असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्री ही खोटी माहिती पसरविण्यात आली होती. 8 / 12दिल्ली पोलिसांनी या बंदुकधारी तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याचं नाव शाहरुख आहे. तो संबंधित परिसरातील स्थानिक रहिवासी आहे9 / 12दिल्लीतील मौजपूर नहर रोडवरील सेठ भगवानदास स्कूलसमोर दंगेखोरांनी दुकानांना आग लावली. गाद्यांच्या दुकानांना आग लावल्यावर हा दंगेखोर जमाव जाफराबादच्या दिशेने घोंडाचौककडे निघाला. 10 / 12दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेले प्रयत्न दिसत आहेत. त्याचदरम्यान, एका दंगेखोराने थेट पोलिसावर पिस्तूल रोखले. मात्र एवढ्या तणावाच्या परिस्थितीतही संबंधित पोलीस कॉन्स्टेबल एक पाऊलही मागे हटला नाही. 11 / 12दिल्लीतील हिंसाचारात रतन लाल या पोलीस हवालदारासह पाच नागरिकांचा मृत्यू झाला. हिंसाचारात पोलीस उपायुक्तासह अनेक पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले.12 / 12व्हिडीओ पत्रकार सौरभ त्रिवेदी यांनी या बंदुकधारी दंगेखोराच व्हिडीओ चित्रित केला असून तो एन्टी सीएए म्हणजे सीएए कायद्याला विरोध करणारा असल्याचे त्यांनी सांगितलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications