अण्णांच्या आंदोलनानं बळ मिळालं; आता AAP नं दिली खासदारकीची संधी, कोण आहे स्वाती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 14:34 IST
1 / 10दिल्ली राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने ३ जणांची नावे निश्चित केलेली आहेत. आपनं दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. मालीवाल या पहिल्यांदाच राज्यसभेच्या खासदार बनणार आहेत. 2 / 10स्वाती यांच्याव्यतिरिक्त संजय सिंह आणि एनडी गुप्ता यांना दुसऱ्यांदा राज्यसभेत पाठवण्याची तयारी आपने केली आहे. माहितीनुसार, पक्षाच्या राजकीय सल्लागार समितीनं शुक्रवारी या तीन नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. येत्या १९ जानेवारीला राज्यसभेच्या ३ जागांवर दिल्लीत मतदान होणार आहे. 3 / 10राज्यसभेच्या विद्यमान खासदारांचा कार्यकाळ २७ जानेवारीला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ३ जानेवारीपासून निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. दिल्लीत आपच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने तिन्हीही उमेदवार जिंकतील याची पक्षाला खात्री आहे. 4 / 10स्वाती मालीवाल या इंजिनिअर होत्या. त्यांच्याकडे सध्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी स्वाती मालीवाल जॉब करत होत्या. 5 / 10काहीतरी चांगले करायचे या हेतूने स्वाती मालीवाल यांनी जॉब सोडला आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनासोबत जोडली गेली. 6 / 10अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, किरण बेदी यांच्यासह स्वाती मालीवाल या कोअर कमिटीमध्ये अण्णांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत होत्या. 7 / 10स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा असून गेल्या ३ टर्मपासून त्याच या पदाचे कामकाज पाहत आहेत. २०१५ मध्ये पहिल्यांदा स्वाती मालीवाल यांना ही जबाबदारी दिली होती. 8 / 10अत्यंत कठीण परिस्थिती आणि संघर्षातून स्वाती मालीवाल इथपर्यंत पोहचल्या आहेत. वडिलांना दारुचे व्यसन होते. लहानपण घरगुती हिंसाचारात गेले. घरात आई, बहिण आणि त्यांना मारहाण व्हायची. वडिलांच्या दहशतीखाली स्वाती मालीवाल यांचं बालपण गेले. 9 / 10घरच्या अशा परिस्थितीमुळे अन्यायाविरोधात आवाज उचलण्याची ठिणगी मनात पेटत होती. त्याला अण्णा हजारेंच्या आंदोलनानं जोर मिळाला. समाजासाठी काही तरी चांगले केले पाहिजे या विचाराने जॉब सोडून आंदोलनात सहभागी झाली. 10 / 10स्वाती मालीवाल सातत्याने महिलांच्या अत्याचाराविरोधात काम करतायेत. त्यामुळे त्यांना ३ वेळा या पदाची जबाबदारी देण्यात आली. आता आप पक्षाकडून स्वाती यांना राज्यसभेची संधी दिली आहे.