शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 4:45 PM

1 / 6
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर आज आपच्या नेत्या, मंत्री आतिशी यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. आतिशी या केजरीवालांच्या निवासस्थानी पोहोचल्या असून दोघेही थोड्याच वेळात उपराज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी केजरीवाल राजीनामा देतील तर आतिशी या नव्या सरकारच्या स्थापनेचा दावा करतील. परंतू अनेकांना केवळ आतिशी हेच नाव माहिती आहे. देशात आडनावही लागते, यामागचे रहस्य काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.
2 / 6
आतिशी यांनी दिल्लीच्या अर्थसंकल्पावेळी महिलांना दर महिन्याला १००० रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतू, केजरीवाल तुरुंगात असल्याने ही योजना प्रत्यक्षात आली नव्हती. आतिशी आता मुख्यमंत्री होणार असल्याने ही योजना सुरु होईल अशी अपेक्षा दिल्लीकर करत आहेत.
3 / 6
आतिशी यांचे आधीचे आडनाव मार्लेना होते. त्यांच्या वजिलांनी मार्क्स आणि लेनिनच्या नावावरून प्रेरित होऊन आतिशींचे आडनाव मार्लेना ठेवले होते. त्यांनी शाळेत दाखला करताना मार्लेना असे आडनाव जोडले होते. हे नाव जर्मन तत्वज्ञानी कार्ल मार्क्स आणि रशियन कम्युनिस्ट क्रांतिकारक व्लादिमीर इलिच यांच्याकडून घेतले गेले होते.
4 / 6
2019 च्या लोकसभा निवडणुकीत आतिशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा त्यांनी मार्लेना हे आडनाव काढून टाकले होते. तेव्हा त्या ख्रिश्चन असल्याची टीका विरोधकांनी केली होती. तर काहींनी त्या पंजाबी राजपूत असल्याचे म्हटले होते. या वादामुळे आपच्या विनंतीनुसार त्यांनी त्यांच्या नावातून मार्लेना हटविले होते.
5 / 6
दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक विजय कुमार सिंग आणि तृप्ता वाही हे त्यांचे आई वडील आहेत. दिल्लीच्या स्प्रिंगडेल स्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतलेले आहे. सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचे शिक्षण घेतले आहे. दिल्ली विश्वविद्यालयामध्ये त्या पहिल्या आलेल्या आहेत.
6 / 6
शिष्यवृत्तीवर पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात गेल्या होत्या. ऑक्सफर्डमधून शिक्षण संशोधनात रोड्स स्कॉलर म्हणून दुसरी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.