delta plus updates know how to wear mask during these days know what doctors says about this
CoronaVirus Live Updates : धोका वाढला! देशात Delta Plus चा हाहाकार, नेमका कसा मास्क वापरावा?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 8:37 AM1 / 15जगभरातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला आहे, तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.2 / 15डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.3 / 15भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत तब्बल 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याची माहिती समोर आली आहे.4 / 15जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोकादायक असलेला डेल्टा व्हेरिएंट हा सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये भारतात आढळून आला आहे. मात्र आता जवळपास 100 देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे.5 / 15मूळ कोरोना व्हायरसपेक्षा हा व्हेरिएंट अडीचपटीने अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढू लागली आहे.6 / 15भारतात कोरोनाचा वेग मंदावत असला तरी डेल्टा प्लसचा कहर पाहायला मिळत आहे. मात्र अनेक ठिकाणी लोकांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. काही जण मास्क न लावता फिरत आहेत. कोरोनाच्या संकटात मास्क अत्यंत महत्त्वाचा आहे. 7 / 15डेल्टा व्हॅरिएंट (Delta Variant) अधिक घातक असल्यानं आपल्याला कोरोनाच्या नियमांचं पालन अधिक काटेकोरपणे करावं लागणार आहे. त्यात मास्क हे सर्वांत मोठं शस्त्र आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार मास्क घालणं किती गरजेचं आहे, याबाबत डॉक्टरांनी काय सल्ला दिला ते जाणून घेऊया...8 / 15नवी दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलचे डॉक्टर (लेफ्टनंट जनरल) वेद चतुर्वेदी यांनी मास्क घालण्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. मास्कबाबत केवळ एकाच देशात नाही, तर जगभर संशोधन करण्यात आलं. तीन प्रकारचे मास्क आहेत. 9 / 15एक कॉटन म्हणजे साधा कापडी मास्क, दुसरा सर्जिकल आणि तिसरा एन95. यापैकी एन95 हा मास्क सर्वांत जास्त सुरक्षित असून, याचा सर्वाधिक वापर डॉक्टर करतात. तुम्हाला जवळच कुठे तरी जायचं असेल तर कॉटन मास्कसह सर्जिकल मास्कदेखील वापरा, असा सल्ला चतुर्वेदी देतात. 10 / 15ज्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालेला असण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तीला भेटण्याची वेळ आल्यास डबल मास्क लावा किंवा एन95 मास्कदेखील (N 95 Mask) वापरू शकता. मास्कशिवाय घराबाहेर पडू नका, असंही डॉ. चतुर्वेदी सांगतात.11 / 15'एम्स'चे डॉक्टर पीयूष रंजन म्हणाले, की कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे (Delta Plus Variant) कोरोनाचा प्रसार वेगाने म्हणजेच दुपटीपेक्षा जास्त होतो हे खरं आहे; मात्र या व्हेरिएंटमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या दराबद्दल अद्याप स्पष्टता नाही. 12 / 15हा व्हायरस वेगाने पसरत असला तरी त्यामुळे रुग्ण दगावण्याचा धोका किती आहे, याबद्दल अद्याप संशोधन सुरू आहे. डेल्टा प्लसवर लस प्रभावी नसल्याचं काही लोक म्हणत आहेत; मात्र हा दावा निराधार आहे. त्यामुळे लस उपलब्ध असल्यास टोचून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. 13 / 15लस या व्हेरिएंटवर पूर्णपणे प्रभावी नसली, तरी त्यामुळे या आजाराची गंभीरता नक्कीच कमी होते, असंही ते म्हणाले. लसीकरणाशिवाय सध्या तरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी दुसरा पर्याय नाही, असंही त्यांनी सांगितलं.14 / 15तुम्ही डबल मास्क लावत असात तर कापडी (Cotton Mask) आणि सर्जिकल मास्क (Surgical Mask) वापरा. दोन्ही कापडी किंवा दोन्ही सर्जिकल मास्क वापरू नका. सर्जिकल मास्क आधी लावून त्यावर कापडी मास्क लावायला हवा.15 / 15एन 95 मास्क एकच वापरला तरीही तो कोरोनापासून आपला बचाव करतो. कोणतेही निर्बंध नसले तरी मास्क लावणं अनिवार्य आहे, असा सल्ला जगभरातल्या सगळ्याच तज्ज्ञांकडून दिला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications