Dharmendra Pradhan played a big role in BJP hat trick in Haryana Election Results
आधी ममता बॅनर्जींचा पराभव, हरयाणातही केली जादू; भाजपाचा सायलेंट किलर कोण? By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 10:58 AM1 / 7हरयाणातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवडणूक प्रभारी बनवून मोठी जबाबदारी दिली होती. निवडणुकीच्या तयारीसाठी ते स्वतः मैदानात उतरले होते.2 / 7भाजपचे मुख्य रणनीतीकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय धर्मेंद्र प्रधान यांच्या रणनीतीसह पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेने हरयाणामध्ये भाजपच्या हॅटट्रिकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.3 / 7रोहतक, पंचकुला आणि कुरुक्षेत्र येथे तळ ठोकून धर्मेंद्र प्रधान काम करत राहिले. निवडणुकीदरम्यान त्यांनी माध्यमांना कोणतीही मुलाखत न देता पक्षाची अंतर्गत रणनीती तयार केली. धर्मेंद्र प्रधान एक महिन्यापेक्षा जास्त काळ हरयाणातून हलले नाही.4 / 7ओडिशानंतर हरयाणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी भाजपला यश मिळवून दिलं. ओडिशाच्या विधानसभा निवडणुकीतही पक्षासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हरियाणातील निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी ग्राऊंड झिरोवर छोट्या-छोट्या बैठका घेतल्या, कार्यकर्त्यांकडून रिअल टाईम फीडबॅक घेतला आणि केंद्रीय नेतृत्वाला माहिती देऊन सर्व त्रुटी दूर केल्या.5 / 7धर्मेंद्र प्रधान यांनी हरयाणातील नाराज नेत्यांनाही रोखून धरण्यात आणि त्यांचे मन वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टीव्ही आणि सोशल मीडियावर पक्षाच्या विरोधात सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करुन प्रधान यांनी दुप्पट उत्साहाने काम करण्याची त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.6 / 7२०१९ प्रमाणे, २०२४ मध्ये पुन्हा एकदा धर्मेंद्र प्रधान यांनी हरयाणातील भाजपची निवडणूक रणनीती व्यवस्थापित करण्यात, दैनंदिन कामकाजावर देखरेख आणि जाहीरनामा तयार करण्यात प्रमुख भूमिका बजावली.7 / 7२०१९ प्रमाणे, २०२४ मध्ये पुन्हा एकदा धर्मेंद्र प्रधान यांनी हरयाणातील भाजपची निवडणूक रणनीती व्यवस्थापित करण्यात, दैनंदिन कामकाजावर देखरेख आणि जाहीरनामा तयार करण्यात प्रमुख भूमिका बजावली. आणखी वाचा Subscribe to Notifications