शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Highway: 'हायवे, एक्सप्रेस वे अन् ग्रीनफील्ड' महामार्गातील फरक, घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 4:35 PM

1 / 9
केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे देशभरात मोठमोठे रस्ते बनवत आहेत. त्यामध्ये, हायवे, एक्सप्रेस वे आणि ग्रीनफिल्ड रस्तेमार्गांचं समावेश आहे.
2 / 9
गेल्या काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते मुंबई ते दिल्ली या राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. तर, राज्य सरकारच्या समृद्धी महामार्गाचेही नोव्हेंबर महिन्यात लोकार्पण झाले आहे.
3 / 9
रस्ते बांधणीसाठी, महामार्गासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही, असे गडकरी सार्वजनिक कार्यक्रमात जाहीरपणे सांगतात. विशेष म्हणजे या रस्ते बांधणीसाठी ते निधीही देतात.
4 / 9
आता, चेन्नई-सूरत या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यासाठी, सध्या जमिन संपादनाचं कामही सुरू आहे. काही शेतकऱ्यांचा विरोध असला तरी हे काम सुरूच आहे.
5 / 9
मात्र, राज्यात, देशात होत असलेल्या या महामार्गांतील तीन प्रकारचा नेमका फरक काय. म्हणजे, हायवे, एक्सप्रेस वे आणि ग्रीनफिल्ड वे म्हणजे नेमकं काय असतं.
6 / 9
हायवे म्हणजे महामार्गाला अनेक रस्ते जोडले जातात, किंवा तेथून पुढे कनेक्ट होत असतात. त्यामुळे, बहुमार्गीय रस्त्यांना जोडणारा वे म्हणजे हायवे असं म्हणतात येईल.
7 / 9
एक्सप्रेस वे मार्गावर पोहोचण्यासाठी कमी रस्ते असतात. म्हणजेच, एक्सप्रेस वेवर तुम्हाला जायचं असेल तर त्याचं निश्चित मार्ग असतो, त्याच मार्गावरुन तुम्हाला एक्सप्रेस वे गाठता येतो.
8 / 9
ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे थोडासा वेगळा असतो. कारण, हा एक्सप्रेस वे शहरापासून दूर, नागरीकरण वस्तीपासून लांब, शेती किंवा पडीक जमिनींजवळून निघतो. या महामार्गासाठी जमिन सहज उपलब्ध होते, आणि रस्ता लवकर बनतो.
9 / 9
ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ला ग्रीन कॉरिडोरही म्हटलं जातं. ज्याठिकाणी यापूर्वी रस्ता नाही, तेथूनच ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे तयार केला जातो. तर, ब्राऊडफील्ड एक्सप्रेस वे म्हणजे सध्याच्या महामार्गाचे रुंदीकरण, विकसित केले जाते.
टॅग्स :highwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकMumbaiमुंबई