शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्यूटी विद ब्रेन! डॉक्टरने पहिल्याच प्रयत्नात पास केली UPSC, झाली IPS; १ मिलियन फॉलोअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 11:51 AM

1 / 10
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. डॉक्टर असलेल्या नवजोत सिमी IPS अधिकारी बनल्या आहेत.
2 / 10
२१ डिसेंबर १९८७ रोजी पंजाबच्या गुरदासपूरमध्ये नवजोत यांचा जन्म झाला. त्यांनी बाबा जसवंत सिंह डेंटल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, लुधियाना येथून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) ची डिग्री प्राप्त केली.
3 / 10
नवजोत यांनी डेंटिस्ट म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी काही काळ काम केलं.
4 / 10
दिल्लीतील एका संस्थेतून कोचिंग घेतलं आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा ७३५ रँकने उत्तीर्ण केली.
5 / 10
आयपीएस सेवा आणि बिहार केडर देण्यात आलं. सध्या नवजोत सिमी या बिहारमध्ये एसपी (वीकर सेक्शन अँड वुमन सेल) पदावर कार्यरत आहेत.
6 / 10
आपल्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारीला आळा घातला. महिला आणि मुलांची सुरक्षा आणि सामाजिक कल्याण सुनिश्चित करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.
7 / 10
एका मुलाखतीत, त्यांनी परीक्षेतील यशासाठी मुख्य घटक म्हणून डेडिकेशन आणि मोटिवेशन यांच महत्त्व अधोरेखित केलं आहे.
8 / 10
सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सामील होण्यासाठी एक क्लिअर व्हिजन आणि कारण असणं आवश्यक आहे आणि त्यातून त्यांना काय साध्य करायचं आहे ते साध्य करता येतं असं म्हटलं आहे.
9 / 10
नवजोत सिमी या इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडियावर देखील खूप एक्टिव्ह आहेत आणि इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल १.१ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
10 / 10
नवजोत सिमी या इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडियावर देखील खूप एक्टिव्ह आहेत आणि इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल १.१ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी