Does the country run due to patriotism? 'Dynasty' in Bollywood and politics
देश घराणेशाहीमुळे चालतो का? बॉलिवूड आणि राजकारणातील 'घराणेशाही' By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 5:47 PM1 / 26काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यामुळे पुन्हा एकदा राजकारणातल्या घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला आहे. समाजवादी पार्टीची धुरा संभाळणारे अखिलेश यादव माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे सुपूत्र आहेत. 2 / 26एम.के.स्टॅलिन हे द्रमुक पक्षाचे प्रमुख करुणानिधी यांचे सुपूत्र आहेत. स्टॅलिन यांच्याकडे भविष्यातील तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते. 3 / 26शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र आहेत. उद्धव बाळासाहेबांचे राजकीय वारसदार आहेत. 4 / 26राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी मनसे हा स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यापूर्वी ते शिवसेनेत होते. उद्धव ठाकरेंबरोबर मतभेद तीव्र झाल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली. 5 / 26कंगना राणौतनं काही दिवसांपूर्वी करण जोहरवर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा झेंडा मिरवण्याचा आरोप करुन तो 'मुव्ही माफिया' आहे, अशी खोचक टीका केली होती. 6 / 26अभिषेक बच्चन अभिनयाचे शेहनशहा अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. 7 / 26रणबीर कपूर आघाडीचा अभिनेता असून, त्याचे वडिल ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांनी 80-90चे दशक गाजवले होते. 8 / 26सोनम कपूर अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी असून, वडील आणि मुलगी दोघेही आज वेगवेगळया सिनेमांमध्ये व्यस्त आहेत. 9 / 26तुषार कपूर - जिंतेद्र या सदाबहार कलाकाराची मुलगा असलेला तुषार बॉलीवूडमधल्या कॉमेडी सिनेमांमध्ये चमकलाय.10 / 26एकता कपूर - मोठ्या पडद्यापासून लांब राहिलेल्या जितेंद्रच्या या मुलीने सास भी कभी बहूसारखे अनेक डेली सोप छोट्या पडद्याला दिले आहेत.11 / 26फरहान अख्तर - जावेद अख्तरच्या मुलानं फरहाननं बॉलीवूडमध्ये काही हिट चित्रपट दिले आहेत. भाग मिल्खा भागमधल्या त्याच्या अभिनयाचं चांगलं कौतुक झालं आहे.12 / 26करीना कपूर - गेली 100 वर्षे सिनेसृष्टीत असलेल्या कपूर खानदानातल्या करीनानं मोठी बहीण करीश्माच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलीवूडमध्ये करीअर केलं.13 / 26करीश्मा कपूर - गोविंदाबरोबर अनेक कॉमेडी हिट देणारी करीश्मा दिल तो पागल हैमध्ये माधुरीसमोरही फिकी पडली नाही. लग्न झाल्यानंतर अभिनयाला राम राम करणाऱ्या करीश्मानं बॉलीवूडमध्ये काही काळ चांगलाच गाजवला.14 / 26सैफ अली खान - वडील क्रिकेटर व आई अभिनेत्री असलेल्या सैफनं बॉलीवूडमध्ये करीअर केलं.15 / 26ह्रितिक रोशन - राकेश रोशनच्या या मुलानं कहो ना प्यार है पासून बॉलीवूडमधली कराकिर्द सुरू केली आणि अनेक चढ उतार बघत सिनेसृष्टीत आपलं स्थान तयार केलं.16 / 26रितेश देशमुख - महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या या मुलाने बॉलीवूडमध्ये करीअर केलं. मराठीमध्येही काही सिनेमांमध्ये झळकलेला रितेश सिनेसृष्टीत स्थिरावलाय.17 / 26सलमान खान - वडील सलीम खान यांनी स्क्रिप्ट रायटर म्हणून कारकीर्द गाजवली. मुलांपैकी सलमान हा बॉलीवूडमधला सुपरस्टार झाला.18 / 26बॉबी देओल - धर्मेंद्रचा हा दुसरा मुलगा मात्र बॉलीवूडमध्ये फारसा प्रभाव पाडू शकला नाही.19 / 26सनी देओल - धर्मेंद्रच्या प्रमाणेच हाणामारीच्या सिनेमांमध्ये चांगला ठसा सनीनं उमटवला. अर्जून, दामिनीसारखे अनेक गाजलेले चित्रपट सनीनं दिले आहेत.20 / 26सोनाक्षी सिन्हा - शत्रुघ्न सिन्हाच्या या मुलीनं बॉलीवूडमध्ये यशस्वी आगमन केलं आहे.21 / 26अथिया शेट्टी - वडील सुनील शेट्टींच्या पावलावर पाऊल ठेवत अथियानं बॉलीवूडची वाट चोखाळली.22 / 26शबाना आझमी - कैफी आझमी या प्रख्यात शायराच्या मुलीनं शबानानं मुख्य धारेतील चित्रपटांबरोबर समांतर सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाची चांगली छाप सोडली आहे. 23 / 26अजित पवार - काका शरद पवार यांचं राजकारण जवळून बघितलेल्या अजित पवारांनी राज्यातल्या राजकारणात जम बसवला.24 / 26सुप्रिया सुळे - वडील शरद पवार यांच्याकडून राजकाराणाचं कडू घेतलेल्या सुप्रिया केंद्रातील राजकारणात रमल्या.25 / 26विश्वजीत कदम - पतंगराव कदमांचा मुलगा असलेला विश्वजीत युवा नेता म्हणून उदयास आला, परंतु लोकसभेत मात्र मोदी लाटेत अपयशी ठरला.26 / 26आदित्य ठाकरे - आजोबा बाळासाहेब व वडीव उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच आदित्यनेही राजकारण हेच करीअर निवडलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications