CoronaVirus: कोरोनाला घाबरून खिडक्या, दारे बंद करू नका! एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले 'काय करावे, करू नये'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 12:32 IST
1 / 10कोरोनाची पहिली लाट ओसरून काही काळ लोटताच दुसऱ्या अजस्त्र लाटेने डोके वर काढले आहे. कोरोनावर विजय मिळवला अशा काहीशा अविर्भावात असलेल्या सरकारला आणि नागरिकांमध्येही यामुळे दहशत पसरली आहे. मधल्या काळात लोकांनी मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे आदी प्रकार केल्याने कोरोना जास्त प्रमाणात फोफावला आहे. 2 / 10आता लोक पुन्हा सावध झाले असून वेगवेगळ्या प्रकारे स्वत:चा बचाव करू लागले आहेत. लोक आता त्यांच्या घरातील खिडक्या, दारे बंद करून आतमध्ये कोंडून घेऊ लागले आहेत. 3 / 10केंद्र सरकारने कोरोनाचा हवेतून प्रसार होत असल्याचे सांगितले आहे. यामुळे शेजारच्या घरात कोरोना पेशंट असेल किंवा जवळून गेला तर कोरोनाचा विषाणू घरात शिरकाव करण्याची धास्ती आता लोकांना वाटू लागली आहे. 4 / 10तसेच केंद्राने आता लोकांनी घरातही मास्क लावून वावरावे असे सांगितले आहे. मात्र, डॉक्टरांनी कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी वेगळे काहीतरी करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. 5 / 10बाहेर फिरताना मास्क लावा, शारिरीक अंतर ठेवा. जो व्यक्ती बाहेर जाईल त्यानेच घरात मास्क घालावे. यामुळे घरातील लोकांना कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका कमी होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 6 / 10दुसरीकडे घराला पूर्णपणे पॅकबंद करणे करणे ठीक नाहीय. या ऐवजी घराला हवेशीर बनवा, खिडकी दरवाजे उघडे ठेवा, असा सल्ला देण्यात आला आहे. 7 / 10डॉक्टरांनी सांगितले की, जर कोणी घरात कोरोनाबाधित असेल तर मास्क घालायचाच आहे. जरी नसला तरीही दाटीवाटीच्या लोकसंख्येच्या भागात उंच इमारतीत राहत असाल तर घरात मास्क लावून राहिलात तर चांगले होईल. 8 / 10एम्सचे डॉक्टर विक्रम सांगतात की, जर कोणताही व्यक्ती घराबाहेर जाणारा असेल तर तो बाहेरून कोरोना संक्रमण आणऊ शकतो. त्याच्यात कोरोनाची लक्षणे नसली तरीही तो घरातील अन्य सदस्यांना संक्रमित करू शकतो. यामुळे घरात मास्क लावणे गरजेचे आहे. कमी सदस्य असतील तर ते वेगवेगळ्या खोलींमध्ये राहू शकतात. अशावेळी अन्य सदस्यांनी मास्क लावण्याची गरज नाही. 9 / 10कोरोनाच्या हवेतून प्रसारावर वरिष्ठ डॉक्टर कमलजीत सिंह कैंथ यांनी सांगितले की, खेळत्या हवेची गरज आहे. जर घरात संक्रमित व्यक्ती असेल आणि त्याचे संक्रमित कण जर घरातच राहिले तर आणि घरातील संक्रमण न झालेल्या लोकांनाही त्याचा धोका आहे. यामुळे घराच्या खिडक्या उघडाव्यात. 10 / 10जर खिडक्या लावलेल्या असतील तर दिवसातून कमीतकमी दोन वेळा खिडक्या आणि दरवाजे उघडण्याची गरज आहे. जे बंदिस्त घरात राहतील त्यांना संक्रमित होण्याचा धोका कैकपटींनी अधिक आहे. यामुळे घाबरून जायची गरज नाही, घरातही मास्क घाला आणि सामाजिक अंतर व हात धुवत रहा, असा सल्ला कमलजीत यांनी दिला आहे.