शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भीमजयंती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास गोष्टी, तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 8:54 AM

1 / 11
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 129 वी जयंती जगभरात घराघरात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी शेअर केल्या जात आहेत. अशाच काही गोष्टी आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत.
2 / 11
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव अंबावाडेकर असं होतं. त्यांना महादेव आंबेडकर नावाचे शिक्षक शिकवत असत. बाबासाहेब हे त्यांचे आवडते विद्यार्थी होते. त्यांच्या सांगण्यावरुनच बाबासाहेबांनी आपलं आडनाव आंबेडकर असे केले.
3 / 11
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी- इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्यूशन' मधून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्यावेळेस अनेक सूचनांचा वापर करण्यात आला.
4 / 11
3) 1955 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मध्य प्रदेश आणि बिहारचं प्रशासन चांगलं चालावं यासाठी दोन्ही राज्याच्या विभाजनाचा सल्ला दिला होता. 45 वर्षांनी या राज्यांचं विभाजन 2000 मध्ये केलं गेलं आणि त्यानंतर छत्तीसगढ आणि झारखंड ही राज्ये तयार झाली.
5 / 11
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा 'वेटिंग फॉर अ व्हिसा' ही कोलंबिया विद्यापीठात अभ्यासक्रमात वापरली जाते.
6 / 11
5) परदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे पहिले भारतीय आहेत.
7 / 11
6) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लग्न झाले तेव्हा ते 15 वर्षांचे होते. तर रमाबाई या 9 वर्षांच्या होत्या.
8 / 11
7) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील सर्वात जास्त शिकलेले संसद सदस्य होते. ते भारताचे पहिले कायदामंत्री होते.
9 / 11
8) डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे गरीब ब्राम्हण विद्यार्थ्यांनाही मदत करायचे. ते म्हणायचे की, ज्यांना सामाजिक सुविधा मिळत नाहीत, ते सर्व गरीब हे दलितच आहेत.
10 / 11
9) भारतीय लेबर कॉन्फरन्सच्या 7 व्या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी भारतातील कंपन्यांमध्ये कामाचे तास 14 वरुन 8 केले.
11 / 11
10) अर्थशास्त्रात नोबेल मिळवणारे जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ प्रा. अमर्त्य सेन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले गुरु मानायचे.
टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीIndiaभारत