शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काय मिळणार सुविधा? पगारही असतो एवढा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 11:39 AM

1 / 9
देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींना नेमका पगार किती, निवासस्थान ते सुरक्षा यांच्याशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया.
2 / 9
निवासस्थान कसे असते? भारताचे राष्ट्रपती हे केवळ देशाचे प्रमुख नसतात तर ते प्रथम नागरिकही असतात. राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ देखील असतात. भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपती भवनात राहतात, जे जगातील सर्वात मोठे राष्ट्रपती भवन आहे.
3 / 9
हे ३२० एकरमध्ये पसरलेले असून, त्यात ३४० खोल्या आहेत. येथे सुमारे २०० लोक काम करतात. राष्ट्रपतींचे निवासस्थान, कर्मचारी, पाहुणे आणि भोजन इत्यादींवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
4 / 9
₹६८.३ कोटींचा खर्च २०२०-२१ मध्ये राष्ट्रपती भवनवर करण्यात आला होता. ₹५५.२ कोटी २०१७-१८ मध्ये राष्ट्रपती भवनमधील विविध बाबींसाठी खर्च झाले होते.
5 / 9
२४ टक्क्यांनी राष्ट्रपती भवनवरील खर्च गेल्या पाच वर्षांत वाढला आहे. ₹४१.९ कोटी प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना (२०१४-१५) राष्ट्रपती भवनवर खर्च झाले होते.
6 / 9
भारताच्या राष्ट्रपतींना मोफत उपचार आणि निवास सुविधा मिळते. निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन म्हणून दरमहा १.५ लाख रुपये. कर्मचाऱ्यांवर खर्च करण्यासाठी महिन्याला ६० हजार वेगळे मिळतात.
7 / 9
याशिवाय आयुष्यभरासाठी राहण्यासाठी मोठा बंगला मिळतो. दोन लँडलाइन आणि एक मोबाइल फोन मोफत. ट्रेन किंवा विमानाने मोफत प्रवास आयुष्यभर मोफत वाहन सुविधा
8 / 9
राष्ट्रपतींना किती पगार मिळतो? सध्या भारताच्या राष्ट्रपतींना दरमहा ५ लाख रुपये पगार मिळतो. ज्यावर त्यांना कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. याशिवाय राष्ट्रपतींना अनेक भत्तेही मिळतात.
9 / 9
राष्ट्रपतींची सुरक्षा कशी असते? भारताच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त असतो. त्यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित ब्लॅक मर्सिडीज बेंझ असते. राष्ट्रपतींकडे अधिकृत दौऱ्यांसाठी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली एक लांब गाडी लिमोझिनदेखील असते. राष्ट्रपतींच्या ताफ्यात २५ वाहने असतात. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी सतत ८६ अंगरक्षक असतात.
टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू