शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतात DRDO बनवणार आधुनिक लेझर हत्यार; चीन अन् पाकिस्तानला घाम फुटणार, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 3:44 PM

1 / 8
युद्धाची शस्त्र आणि पद्धतसुद्धा काळानुसार बदलत आहे. पारंपारिक हत्यारांची जागा दूरून हल्ला करत असलेल्या शस्त्रांनी घेतली आहे. हॉलिवूडच्या सिनेमांप्रमाणे भारतातही अत्याधुनिक शस्त्र बनवली जाणार आहेत. ज्यामुळे शेजारी देशांना नक्की घाम फुटेल अशा चर्चा आहेत.
2 / 8
डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन (DRDO) लेजरनं हल्ला करणारी हत्यारं तयार करत आहे. या शस्त्रांना डायरेक्ट एनर्जी वेपन असं म्हणतात.
3 / 8
याव्यतिरिक्त मायक्रोवेव किरणं सोडून शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक, रेडियो सिस्टमला नष्ट करता येऊ शकतं. कमांड देता न आल्यामुळे शत्रू हतबल झाल्यामुळे आक्रमण करणं सोपं होतं.
4 / 8
DEW मध्ये हाय एनर्जी लेजर आणि हाय पावर मायक्रोवेव्सचा समावेश आहे. ही हत्यारं तयार करण्यासाठी भारतानं राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यात DEW च्या वेगवेगळ्या हत्यारांचा समावेश असेल. या हत्यारांची क्षमता १०० किलोवॉट असेल. शत्रूकडू येत असलेले मिसाईल्स फायटर जेट किंवा ड्रोनला नष्ट करण्यासाठी ही शस्त्र प्रभावी ठरतील.
5 / 8
या प्रकल्पाचं नाव काली बीम आहे. हे लेजर बीम हल्यात कोणत्याही प्रकारचा आवाज तीव्रतेनं जाणवत नाही . मागील काही दिवसात एंटी ड्रोन DEW सिस्टम तयार करण्यात आले होते. यांची टारगेट रेंज एक ते दोन किलोमीटर होती. हे स्वदेशी हत्यार युएसस, रशिया, चीन, जर्मनी, इज्राईलच्या तुलनेत लहान आहेत. या हत्यारांच्या मदतीनं एकापेक्षा जास्त ड्रोन, वाहनं किंवा बोटींना नष्ट करता येऊ शकतं.
6 / 8
डीआरडीओनं भविष्य काळातील गरजा लक्षात घेता १० वर्षांची योजना तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात ६ ते ८ किलोमीटर नंतरच्या टप्प्यात २० किलोमीटरपर्यंत अवजारांची रेंज वाढवण्याची तयारी केली आहे.
7 / 8
अन्य अवजारांच्या तुलनेत या शस्त्रांची ऑपरेशनल कॉस्ट कमी असते. विजेचा पुरवठा व्यवस्थित होत असल्यास अनेकदा या शस्त्रांचा वापर होऊ शकतो.
8 / 8
अमेरिकेनं अनेक वर्षांपूर्वी ३३ किलोवॉटच्या लेजर गन्सनी ड्रोन पाडले होते. अमेरिकेकडे सध्या ३०० ते ५०० किलोवॉटपर्यंत डायरेक्ट एनर्जी वेपन्स आहेत. या द्वारे क्रुझ मिसाईल्सवर हल्ला केला जातो.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलDRDOडीआरडीओ