शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

NDA In Rajyasabha: NDA साठी 'अग्निपथ'? बिहारमध्ये सरकार गेल्यानंतर, राज्यसभेतही अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 1:28 PM

1 / 7
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपसोबतची युती तोडली आहे. ते आता महाआघाडीसोबत सरकार स्थापन करणार आहेत. यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेतृत्व करणाऱ्या भाजपची बिहारमधील सत्ता तर गेलीच. शिवाय त्यांना राज्यसभेतही मोठा झटका बसला आहे.
2 / 7
नितीश कुमार यांच्या जेडीयूचे राज्यसभेत एकूण पाच खासदार आहेत. यात उपसभापती हरिवंश नारायण सिंहही आहेत. खरे तर जेडीयू जेव्हा एनडीएचा भाग होता, तेव्हाही भाजपकडे राज्यसभेत बहुमत नव्हते. जेडीयू हा गेल्या तीन वर्षांत भाजपची साथ सोडणारा तिसरा पक्ष आहे. यापूर्वी शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलानेही भाजपची साथ सोडली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी टीडीपीनेही एनडीएची साथ सोडली होती.
3 / 7
आता जेडीयू एनडीएचा भाग राहिलेला नाही. यामुळे, राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला ओडिशाच्या बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशच्या वायएसआरसीपीवर अधिक अवलंबून राहावे लागणार आहे.
4 / 7
सध्या राज्यसभेत 237 सदस्य - राज्यसभेत सध्या एकूण 237 सदस्य आहेत. यांपैकी 8 जागा रिक्त आहेत, यात जम्मू-काश्मीरमधील 4, त्रिपुरातील एक आणि तीन सदस्य नामनिर्देशित करण्यात येणार आहे. राज्यसभेतील बहुमताचा आकडा 119 आहे. सभागृहात एनडीएचे 115 सदस्य होते. यात पाच नामनिर्देशित आणि एक अपक्ष सस्य आहे. मात्र आता जेडीयू बाहेर पडल्यानंतर एनडीएचा आकडा 110 वर आला आहे, जो बहुमतापेक्षा 9 ने कमी आहे.
5 / 7
दुसऱ्या पक्षांवर अवलंबून राहावे लागणार - हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकार तीन खासदारांना नामनिर्देशित करू शकते. तसेच, जेव्हा निवडणूक होईल, तेव्हा त्रिपुराची जागा भाजपच्याच खात्यात जाईल. तेव्हाही एनडीएची सदस्य संख्या 114 पर्यंतच पोहोचू शकते. जी बहुमतासाठी पुरेशी नाही. यामुळे महत्वाच्या विधेयकांसाठी भापला बीजेडी आणि वायएसआरसीपीच्या समर्थनावरच अवलंबून रहावे लागेल.
6 / 7
बीजेडी आणि वायएसआरसीपी, या दोन्ही पक्षांचे राज्यसभेत प्रत्येकी 9-9 खासदार आहेत. महत्वाचे म्हणजे नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला शिरोमणि अकाली दल, मायावतींचा बहुजन समाज पार्टी, टीडीपी, वायएसआरसी आणि बीजेडीचे समर्थन मिळाले होते.
7 / 7
राज्यसभेत एनडीएचे किती सदस्य - राज्यसभेतील एनडीएच्या आकडेवारीसंदर्भात बोलायचे झाल्यास, भाजपचे 91 सदस्य, एआयएडीएमकेचे 4, एसडीएफचा 1, आरपीआयएचा 1, एजीपीचा 1, पीएमकेचा 1, एमडीएमकेचा 1, तामिळ मनिलाचा 1, एनपीपीचा 1, एमएनएफचा 1, यूपीपीएलचा 1, INDचा 1 आणि पाच नामनिर्देशित आहेत. अशा प्रकारे एनडीचा राज्यसभेतील एकूण आकडा 110 वर पोहोचतो. आज दुपारी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
टॅग्स :BJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारBiharबिहारRajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदी