शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवीच्या विद्यार्थ्याने बनविली सौर ऊर्जेवर चालणारी ट्रेन; रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 14:20 IST

1 / 5
अजमेरमधील नागौर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सुनील बुरडक या 14 वर्षाच्या मुलाने लहान वयात एक कारनामा केला आहे की त्याची चर्चा सगळीकडे आहे. रेल्वेचे अधिकारीही त्याचं कौतुक करत आहे. या मुलाने शेतामध्ये रेल्वे रुळ बनवून त्यावर सौर ऊर्जेने चालणारी ट्रेन बनविली आहे.
2 / 5
सध्या ही ट्रेन खेळण्यातील वस्तूपासून बनविली आहे मात्र सौर ऊर्जेचा वापर करत ही ट्रेन ट्रॅकवरुन धावताना दिसत आहे. या ट्रेनचं मॉडेल सध्या सुनीलच्या शेतात असून त्यामध्ये रेल्वे फाटक, सिग्नल, प्लॅटफॉर्म, ओव्हरब्रीज याची हुबेहुबे प्रतिकृती तयार केली आहे.
3 / 5
सुनीलने याआधी मोटारसायकलच्या इंजिनपासून हेलिकॉप्टर बनविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र साधनसामुग्री कमी पडल्याने तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. सुनीलला सौर ऊर्जेवर चालणारी ट्रेन बनविण्यासाठी पाच महिन्याचा कालावधी लागला.
4 / 5
सुनीलच्या घरापासून काही अंतरावर एक रेल्वे ट्रॅक आहे. लहानपणापासून सुनीलला ट्रेनचा हॉर्न ऐकल्यानंतर धावणारी ट्रेन बघण्याची खूप आवड होती. तेव्हापासून सुनीलला ट्रेनबद्दल प्रचंड आकर्षण आहे. आता 5 महिन्यांच्या मेहनतीनंतर त्याने शेतात 60 फूट लांब रेल्वे ट्रॅकचा मॉडेल बनविला आहे.
5 / 5
या मॉडेल ट्रेनची चाकं प्लास्टिकच्या बाटलीचे झाकण आहेत. ज्यावर तांब्याची तार लपटलेली आहे. ही तार इंजिनमध्ये लागलेल्या मोटारीशी जोडली आहे. ज्यावेळी सौर ऊर्जा बॅटरीच्या तारेशी संपर्क येऊन त्यामध्ये विद्युत प्रवाह तयार होतो. तांब्यापासून करंट मोटारीपर्यंत पोहचतो.
टॅग्स :railwayरेल्वे