Kamakhya Devi Mandir: शिंदे गट कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार! काळी जादू उतरविणे, वशीकरणासाठी प्रसिद्ध शक्तीपिठ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 09:21 IST
1 / 8आसामचे गुवाहाटी गेल्या तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाले होते. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून आमदारांची फौजच गुवाहाटीला नेली होती. राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. तिथे आणखी एक घटना घडली होती. शिंदे आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा महाराष्ट्रातून संजय राऊत यांनी रेड्यांच्या बळीचे वक्तव्य केले होते. आता पुन्हा सरकार स्थापन झाल्यावर शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. कामाख्या देवीचे मंदिर एवढे मोठे शक्तीपीठ आहे? काळी जादू उतरविणे, वशीकरण करणे आदींसाठी तर नक्कीच...2 / 8कामाख्या मंदिर हे एक प्रसिद्ध तीर्थ स्थळ आहे. हे मंदिर तांत्रिक देवी-देवतांसाठी समर्पित आहे. मंदिराच्या उत्पत्तीची कहाणी देखील आहे. या मंदिराला ५१ शक्तीपीठांमध्ये गणले जाते. हिंदू धर्मामध्ये ५१ आणि १०८ शक्तीपिठांचे वर्णन केले जाते. 3 / 8एका प्रचलित कथेनुसार भगवान विष्णुंद्वारे सती मातेचे शरीर भस्मसात झाल्यावर कामाख्या देवीचे शरीर ५१ तुकड्यांमध्ये विभाजित करण्यात आले होते. हे तुकडे जिथे जिथे पडले त्या ठिकाणांना शक्तीपीठांमध्ये गणले जाते. कामाख्या मंदिर एक असे शक्तीपीठ आहे जिथे माता सतीच्या योनीची पूजा होते. हे मंदिर याचसाठी नाही तर काळी जादू उतरविण्यासाठी देखील ओळखले जाते. यासाठी देशातील एकमेव प्रसिद्ध मंदिर आहे, जिथे आजही यासाठी लोक दूरदूरवरून येतात. 4 / 8कामाख्या मंदिरात काळ्या जादूवरील पूजेबाबत जुन्या काळापासून मान्यता आहे. या मंदिरात काळी जादू, किंवा वशीकरणाचे तोटके केले जात नाहीत, तर काळ्या जादूपासून सुटका करून घेण्यासाठी लोक इथे येतात. कोणत्याही समस्येने पीडीत लोक असतील तरी देखील ते इथे येतात. 5 / 8काळी जादू करणे हा कायद्याने गुन्हा आहे. काळी जादू केल्याचे प्रकार आपण अनेकदा अघोरी भोंदू बाबा, साधू यांच्याबाबत ऐकतो. मान्यतेनुसार या अघोरींना दहा महाविद्या ज्ञात आहेत. कामाख्या मंदिरातील पूजेमध्ये काळ्या जादूवरील उपाय केले जातात. कामाख्या मंदिर मानवतेच्या विरोधात काम करण्यासाठी नाहीय, तर मदत करण्यासाठी आहे. मंदिराच्या आजुबाजुला बसणाऱ्या साधुंमध्ये सिद्धी आणि शक्ती प्राप्त केलेली असते, असे सांगितले जाते. 6 / 8शिंदे गेले होते तेव्हा राऊतांनी ४० रेड्यांचा बळी देण्याचे वक्तव्य केले होते. याचे कारण कामाख्या देवी मंदिरात होणाऱ्या विधींमध्ये पशुबलिदान हा महत्त्वाचा भाग आहे. कामाख्या देवीला प्रसन्न करण्यासाठी बकरा आणि रेड्यांचा बळी दिला जातो. आजच्या काळात, कायद्याने हे करणे गुन्हा असले तरी देखील या गोष्टी केल्या जातात. 7 / 8वशीकरण म्हणजेच आकर्षण पूजा. ही पूजा येथे चांगल्या इच्छेने केली जाते. या पूजेचा अर्थ इथे पती पत्नीच्या नात्याला वाचविणे हा असतो. कामाख्यामध्ये वशीकरणात दोन व्यक्तींचा विचार एकसारखा बनविणे आणि त्यांना मानसिक रुपाने सामान्य बनविण्याच्या उद्देशाने केली जाते. 8 / 8टीप : ही माहिती काळ्या जादूचा प्रचार करत नाही. कामाख्या मंदिराच्या प्रचलित काळ्या जादूबद्दलच्या सामान्य परंपरा आणि विश्वासाबद्दल यामध्ये सांगण्यात आले आहे.