शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

UP Election 2022: PM मोदी आणि योगी आदित्यनाथ म्हणजे ‘रब ने बना दी जोडी’; राजनाथ सिंहांची स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 3:30 PM

1 / 11
आगामी काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी BJP सह अन्य सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
2 / 11
इतकेच नव्हे, तर अनेक पक्षांनी भाजपला पराभूत करण्याचा निश्चय केला असून, भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ८ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फायदा घेण्याची योजनाही तयार करण्यात येत आहे. (UP Election 2022)
3 / 11
उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात किसान पंचायत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपच्या विरोधात असणाऱ्या छोट्या, स्थानिक पक्षांची एकत्रित मोट बांधण्याचाही प्रयत्न सुरू करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
4 / 11
या घडामोडींमध्ये भाजपही मागे नाही. एकूणच पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशात विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी हजेरी लावली होती. राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी लखनऊमध्ये १७१० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
5 / 11
यावेळी राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ ही तर देवाने बनवलेली अप्रतिम जोडी असल्याचे म्हटले आहे. या दोघांनी केंद्रात आणि राज्यात सुरू केलेल्या कल्याणकारी योजना राबवणे सोपी गोष्ट नाही, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
6 / 11
योगी आदित्यनाथ गुन्हेगारांविरोधात कडक शिक्षा देतात. त्यामुळे त्यांचे नाव ऐकून गुन्हेगार घाबरतात. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री नसते तर, लखनऊ मतदारसंघाचा इतका विकास करू शकलो नसतो, असे सांगत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात झालेली विकासकामे कौतुकास्पद आहेत.
7 / 11
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ ही दोघांची अद्भूत जोडी देवाने बनवली आहे, असे नमूद करत संरक्षण मंत्रालय अंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) लखनऊजवळ ब्रह्मोस क्षेपणास्त्र तयार करेल आणि या संदर्भात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी एका महिन्यात २५० एकर जमीन उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे, असे सिंह म्हणाले.
8 / 11
या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार संपूर्ण राज्याचा विकास करेल आणि कोणत्याही आघाडीवर मागे राहणार नाही.
9 / 11
यावेळी विकासकामांची पायाभरणी तसेच लोकार्पण करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय आणि आरोग्य, स्मार्ट सिटी मिशन, सेतू निगम आणि सिंचनाच्या १८० योजनांचा समावेश आहे.
10 / 11
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप प्रत्येक घरात मोदी-योगींचे काम आणि रामचंद्रांचे नावही घेऊन जाणार आहे. याशिवाय, धर्मांतरण आणि लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्यालाही धार चढवण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थेतील विजयालाही 'मेगा इव्हेट' बनविले जाणार आहे.
11 / 11
भाजपने राज्यातील स्थानिक पक्षांसोबत असलेल्या आघाडीला मजबूत करतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही खूश करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या माध्यमातून सुमारे एक लाख कार्यकर्त्यांची सरकारपासून पक्षसंघटनेपर्यंत नियुक्ती करण्याची योजना भाजपाने आखली असल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकRajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा