शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

EVM मशीन काम कसे करते? हॅक होऊ शकते का? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 2:38 PM

1 / 7
Assembly Elections 2023: आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. काही दिवसांपूर्वीच या राज्यांतील उमेदवारांचे भवितव्य EVM मशीनमध्ये सील झाले होते. आता याच ईव्हीएमद्वारे विजयी आणि पराभूत उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत. दरम्यान, प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएमची सर्वाधिक चर्चो होते. मशीन हॅक केले किंवा यात गडबड केली, असा आरोप होतो. पण, खरंच हे मशीन हॅक करता येते का? जाणून घेऊ...
2 / 7
EVM चा अर्थ काय आणि भारतात कधी दाखल झाले?-यापूर्वी बॅलेट पेपरद्वारे मतदान होत होते. आता बॅलेट पेपरची जागा ईव्हीएम मशीनने घेतली आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जातात. ईव्हीएमचे पूर्ण नाव इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आहे. पूर्वी बॅलेट पेपरवर मतदान व्हायचे, पण 1982 मध्ये भारतात पहिल्यांदा या मशीनचा वापर सुरू झाला होता.
3 / 7
EVM: एक स्टँड अलोन मशीन-ईव्हीएम हे मत जमा करण्यासाठीचे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे दोन युनिट्सचे बनलेले असते, ज्यामध्ये कंट्रोल युनिट आणि बॅलेटिंग युनिटचा समावेश होतो. हे पाच मीटरच्या केबलने जोडलेले आहे.
4 / 7
ईव्हीएमला नेटवर्क जोडलेले नसते-निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार या यंत्रांवर कोणत्याही संगणकाचे नियंत्रण नाही. ईव्हीएममध्ये डेटासाठी फ्रिक्वेन्सी रिसीव्हर किंवा डीकोडर नाही. मतदान केल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केला जातो. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात निकालाच्या दिवशीच ते उघडले जाते. म्हणजेच, यात कोणत्याही प्रकारची हॅकिंग केली जाऊ शकत नाही.
5 / 7
ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाची प्रक्रिया-यात कंट्रोल युनिट (CU) आणि बॅलेटिंग युनिट (BU), असे दोन भाग असतात. कंट्रोल युनिट हे पीठासीन अधिकारी म्हणजेच रिटर्निंग ऑफिसर (RO) यांच्याकडे असते. बॅलेटिंग युनिट मतदानाच्या डब्यात ठेवलेले असते. लोक इथे येतात आणि मतदान करतात. पीठासीन अधिकारी मतदाराची ओळख पडताळतो आणि त्यानंतर मतदार कंट्रोल युनिटचे बटण दाबून मत देतो.
6 / 7
ईव्हीएमची रचना कोणी केली?-भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL), बंगळुरू आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL), हैदराबाद यांच्या सहकार्याने निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञ समितीने EVM डिझाइन आणि विकसित केले आहे. ईव्हीएम मशिन्स फक्त भेल आणि ईसीआयएलद्वारेच बनवल्या जातात.
7 / 7
व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) देखील EVM सोबत येते. ज्यातून एक स्लिप बाहेर येते. या स्लिपमध्ये ज्या उमेदवाराला मतदान झाले आहे, त्या उमेदवाराचा फोटो आणि निवडणूक चिन्ह दिसते.
टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगEVM Machineएव्हीएम मशीनMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकchhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३