शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्नसोहळ्याला आणलेला हत्ती बिथरला, थेट मंडपात घुसला, वऱ्हाड्यांची पळापळ, तर नवरदेवाने...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 4:54 PM

1 / 7
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एका लग्नसोहळ्यामध्ये हत्ती बिथरल्याने वऱ्हाडी मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली. या गोंधळात रथामध्ये बसलेल्या नवरदेवाला उडी मारून आपला जीव वाचवावा लागला.
2 / 7
प्रयागराजमधील नारायणपूर येथे ११ जून रोजी एका विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रात्री वरात पोहोचली. यादरम्यान, तिथे असलेला हत्ती बिथरला. या हत्तीने विवाहस्थळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. हा हत्ती एवढ्यावरच थांबला नाही तर आजूबाजूच्या अनेक घरांचेही नुकसान केले.
3 / 7
यादरम्यान, माहुताने त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला असता हत्तीने त्यालाही सोडले नाही. मग या हत्तीने नवरदेव बसलेल्या रथाकडे आपला मोर्चा वळवला.
4 / 7
हत्ती जवळ येत असल्याचे पाहताच नवरा देव आनंद त्रिपाठी याने रथातून उडी मारून आपला जीव वाचवला. दुसरीकडे रथवाल्याने घोड्याला रथापासून वेगळे केले.
5 / 7
हत्ती धुमाकूळ घातल असल्याची माहिती मिळताच तीन पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. खूप प्रयत्नांनंतर ग्रामस्थांच्या मदतीने या हत्तीवर नियंत्रण मिळवून त्याला इथून हाकलवण्यात यश आले. सुदैवाने या काळात या हत्तीने कुठल्याही व्यक्तीला हानी पोहोचवली नाही.
6 / 7
प्रयागराजमध्ये झालेल्या या विवाह सोहळ्यात सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी हत्ती, घोडे आणण्यात आले होते. मात्र वरात आणि लग्नसोहळ्यातील गर्दी पाहून हा हत्ती बिथरला. त्यानंतर लग्नसोहळ्याच्या ठिकाणी असलेला तंबू तसेच इतर गाड्यांचेही त्याने नुकसान केले.
7 / 7
हा हत्ती एवढा संतप्त झालेला होता की त्याने लग्नमंडपसुद्धा सोडला नाही. हा मंडप पूर्णपणे उदध्वस्त केला.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न