The engine will run in Unlock 1, 200 special trains will leave from June 1 MMG
Unlock 1 मध्ये इंजिन धावणार, 1 जूनपासून २०० विशेष रेल्वेगाड्या सुटणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 5:03 PM1 / 13 रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. १२ मेपासून चालविण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित गाड्यांच्या व्यतिरिक्त या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. 2 / 13प्रवाशांच्या सुविधेसाठी ३१ मेपासून ३० दिवसांऐवजी १२० दिवस आधी या गाड्यांचे आरक्षण करता येणार आहे.3 / 13 लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वे 1 जूनपासून 200 अतिरिक्त गाड्या चालवणार आहे, त्या एसी नसलेल्या असतील. 4 / 13रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. आधीपासून कार्यरत 30 गाड्यासुद्धा या २०० गाड्यांसह सुरू राहतील.5 / 13रेल्वेने चार महिन्यांपूर्वीच या गाड्यांसाठी अॅडव्हान्स तिकिटांची बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच तात्काळ कोट्यातून तिकिट बुकिंग सुरू झाले आहे.6 / 13रविवारी आधीच्या एक महिन्यापूर्वी अॅडव्हान्स बुकिंगचे नियम बदलले जातील. तसेच मधल्या स्थानकांवरून तिकिट बुकिंगची सेवा 31 मे रोजी सकाळी तिकीट काऊंटर व ऑनलाइन सेवेद्वारे सुरू करण्यात आली आहे. 7 / 13प्रवाशांना या गाड्यात प्रवास करण्यासाठी ९० मिनिटे अगोदर रेल्वे स्थानकावर यावे लागले, तेथे स्क्रिनींग केल्यानंतरच प्रवाशांना गाडीत बसता येईल.8 / 13 सोशल डिस्टन्स आणि मास्क हे बंधनकारक असणार आहे, ऑनलाईन सेवेसह काऊंटरवरही तिकीट सुविधा उपलब्ध असणार आहे9 / 13केवळ रिझर्व्हेशन कन्फर्म आणि आरएसी असलेल्या प्रवाशांनाचा रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळणार आहे, मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे बंधनकार आहे. 10 / 13केवळ रिझर्व्हेशन कन्फर्म आणि आरएसी असलेल्या प्रवाशांनाचा रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळणार आहे, मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे बंधनकार आहे. 11 / 13केवळ रिझर्व्हेशन कन्फर्म आणि आरएसी असलेल्या प्रवाशांनाचा रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळणार आहे, मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे बंधनकार आहे. 12 / 13या रेल्वेतील प्रवासात प्रवाशांना चादर, उशी किंवा इतर सुविधा मिळणार नाहीत13 / 13या रेल्वेतील प्रवासात प्रवाशांना चादर, उशी किंवा इतर सुविधा मिळणार नाहीत आणखी वाचा Subscribe to Notifications