शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दर महिन्याची २७ तारीख लक्षात ठेवा, कोट्यवधी लोकांना होणार फायदा, जाणून घ्या कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 20:05 IST

1 / 8
EPFO शी संबंधित कोणतेही काम अडकले आहे किंवा पेन्शनशी संबंधित कोणतीही समस्या आहे. तुमच्या शहरात EPFO ​​ऑफिस नसल्यामुळे तुम्हाला इतर शहरात भटकावे लागेल असा विचार करत आहात, मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
2 / 8
तुम्हाला फक्त दर महिन्याची २७ तारीख लक्षात ठेवायची आहे. कारण एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) 'निधी तुमच्या जवळ स्कीम 2.0' आणली आहे. ज्या अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला EPFO ​​तुमच्या शहरात पोहोचते जिथे तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करता येते.
3 / 8
EPFO चा 'निधी आपके निकट' कार्यक्रम ही देशातील 5 कोटींहून अधिक EPFO ​​धारकांसाठी सुरू केलेली एक विशेष योजना आहे. याद्वारे EPFO ​​मोठ्या प्रमाणात देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचत आहे. यावर्षी २७ जानेवारीला हा उपक्रम सुरू झाला.
4 / 8
निधी आपके निकट २.० काय आहे? - EPFO ने आपल्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमात एक हेल्प डेस्क तयार केला जाईल जिथे सदस्यांना ऑनलाईन क्लेम करणे इत्यादी सेवा मिळतील.
5 / 8
ईपीएफओच्या तक्रार पोर्टलवर नोंदणी केली जाईल आणि प्राधान्याने ती सोडवली जाईल. दर महिन्याच्या २७ तारखेला हा कार्यक्रम होतो. 'निधी आपके निकट' हा एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये EPFO ​​भागधारक तक्रार निवारणासाठी EPFO ​​विभागीय कार्यालयांना भेट देतात.
6 / 8
निधी आपके निकट 2.0 अंतर्गत, EPFO ​​भागधारकांपर्यंत पोहोचेल, ज्यामुळे देशातील सर्व जिल्ह्यांपर्यंत संघटनेची पोहोच वाढेल. दर महिन्याला एकाच दिवशी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
7 / 8
निधी आपके निकट 2.0 प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला आयोजित केला जातो. जर महिन्याच्या २७ तारखेला सुट्टी असेल तर ती पुढील कामकाजाच्या दिवशी घेतली जाईल. 'निधी आपके निकट' ची योजना बळकट आणि विस्तार करण्यासाठी देशातील ५०० हून अधिक जिल्हे समाविष्ट केले आहेत जिथं EPFO ​​कार्यालये नाहीत.
8 / 8
EPFO च्या भागधारकांना सामाजिक सुरक्षा आणि अखंड सेवा देता येईल. हा कार्यक्रम यशस्वी आणि प्रभावी करण्यासाठी सर्व भागधारकांनी शिबिरांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन ईपीएफओने केले आहे.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी