शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jaya Kishori : जया किशोरींच्या सौंदर्यासमोर दीपिका-आलियासारख्या अभिनेत्रीही फिक्या, चेहऱ्यावरून हटत नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 4:23 PM

1 / 8
प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी यांचा वेगळ्याने परिचय करून देण्याची गरज नाही. त्यांचा साधेपणा आणि सौंदर्याचे लाखो लोक चाहते आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.
2 / 8
ज्या वयामध्ये तरुणी नटण्यासवरण्यावर अधिक लक्ष देतात. त्या वयामध्ये जयाकिशोरी यांनी देवाच्या भक्तीमध्ये स्वत:ला वाहून घेतले होते.
3 / 8
जया किशोरी प्रसिद्ध कथावाचक, मोटिव्हेशनल स्पीकर आणि भजन गायिका आहेत. त्यांचं नाव खूप चर्चेत असतं. त्या नेहमी कृष्णभक्तीमध्ये लीन असतात.
4 / 8
जया किशोरी यांचं खरं नाव जया शर्मा आहे, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. त्यांचा जन्म राजस्थानमधील सुजानगड येथे १३ जुलै १९९५ रोजी झाला होता. लोक त्यांचं प्रवचन अगदी साथेपणानं ऐकतात सोबतच त्यांच्या साधेपणाकडेही आकर्षित होतात.
5 / 8
जया किशोरी यांच्या आईचं नाव गीता देवी हरितपल आहे. तर वडिलांचं नाव शिवशंकर शर्मा आहे. जया शर्मा यांची एक लहान बहीणसुद्धा आहे. तिचं नाव चेतना शर्मा आहे.
6 / 8
जया किशोरी यांनी बी.कॉमपर्यंत शिक्षण घेतलं आहे, सोबतच अध्यात्मामध्येही मन रमवलं. अगदी लहान वयात त्यांनी आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली होती.
7 / 8
जया किशोरी यांना २०१६ मध्ये आदर्श युवा आध्यात्मक गुरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याशिवाय सन २०१९ मध्ये झालेल्या फेम इंडिया आशिया पोस्ट सर्व्हेमध्ये त्यांना युथ आयकॉन म्हणून गौरवण्यात आले.
8 / 8
तसेच २०२१ मोटिव्हेशनल स्पीकर ऑफ द ईयरचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. २७ वर्षीय जया किशोरी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे ५.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकCelebrityसेलिब्रिटीIndiaभारत