Every year 1 lakh Indians accept foreign citizenship, how many people have gone so far..?
दरवर्षी 1 लाख भारतीय स्विकारताहेत परदेशी नागरिकत्व, आतापर्यंत किती लोक गेले..? By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 8:42 PM1 / 8 नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकांचा परदेशी नागरिकत्व घेण्याचा कल खूप वाढला आहे. चांगली शिक्षण व्यवस्था आणि चांगल्या नोकरीच्या शोधात परदेशात स्थलांतरित झालेल्या बहुतेकांनी आता तिथले नागरिकत्व घ्यायला सुरुवात केली आहे. 2 / 8 सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे 1 लाख लोक भारत सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेत आहेत. काही महिन्यांपूर्वीच देशाचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना भारतीय नागरिकांनी परदेशी नागरिकत्व घेतल्याची आकडेवारी मांडली होती. 3 / 8 2015 मध्ये 1,41,000 लोकांनी परदेशी नागरिकत्व घेतले होते, तर 2016 मध्ये ही संख्या 144,000 च्या पुढे गेली होती. 2019 पर्यंत ही संख्या वाढतच गेली. 4 / 8 2020 मध्ये कोरोनामुळे हा आकडा थोडासा खाली आला असला तरी 2021 पासून हा आकडा पुन्हा 100000 च्या जवळपास गेला. म्हणजेच दररोज 350 हून अधिक भारतीयांना परदेशी नागरिकत्व मिळत आहे.5 / 8 तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चांगले शिक्षण, चांगल्या करिअरची हमी आणि आर्थिक समृद्धीच्या शोधात भारतीय परदेशात जात आहेत आणि तिथले नागरिकत्व घेऊन तिथे स्थायिक होत आहेत. 6 / 8 भारतातील मोठ्या प्रमाणात नोकर्या गमावणे, चांगल्या शिक्षण व्यवस्थेचा अभाव आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी व्यावसायिक वातावरणाचा अभाव ही स्थलांतराची सर्वात मोठी कारणे असल्याचे अनेक शोधनिबंधांमधून समोर आले आहे.7 / 8 2017 ते 2021 दरम्यान, इतर देशांचे नागरिकत्व घेणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी 42% भारतीयांची अमेरिका ही पहिली पसंती आहे. कॅनडा दुसऱ्या क्रमांकावर असून, तिथे गेल्या 5 वर्षात 91,000 भारतीय लोकांनी नागरिकत्व मिळवले आहे. 8 / 8 ऑस्ट्रेलिया 86,000 लोकांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर 66,000 लोकांसह इंग्लंड आणि 23,000 लोकांसह इटली अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications