EVMs made of gold and silver for awareness of voting
मतदानाच्या जनजागृतीसाठी त्याने बनवली सोन्या-चांदीने मढवलेली EVM By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 7:09 PM1 / 5लोकसभा निवडणुकीमुळे सध्या देशातील वातावरण राजकीय रंगात रंगले आहे. दरम्यान, मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी तामिळनाडूमधील एका व्यक्तीने चक्क सोन्या-चांदीने मढवलेली EVM ची प्रतिकृती बनवली आहे. 2 / 5या ईव्हीएमवर विविध राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे चितारलेली आहेत. ईव्हीएमची ही प्रतिकृती बनवण्यासाठी सोने आणि चांदी वापरण्यात आली आहे. 3 / 5राज असे या इव्हीएमची प्रतिकृती बनवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो तामिळनाडूमधील कोईंबतूर येथील रहिवासी आहे. 4 / 5राज याने याआधीही काही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती तयार केलेल्या आहेत. वरील चित्रात दिसत असलेला कम्पास आणि त्यावर अडवलेल्या पेन्सिलवरील हात वर करून पाहत असलेली व्यक्ती मतदान करण्याचे आवाहन करत आहे. 5 / 5दरम्यान, सोने आणि चांदीचा मुलामा देऊन तयार केलेले इव्हीएम घडवण्यासाठी 1 ग्रॅम चांदी आणि 300 मिलिग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications