experts warn jn 1 may lead news covid pandemic know why new covid variant seems dangerous
अरे बापरे! 41 देशांमध्ये JN.1 चा प्रसार; नवा व्हेरिएंट देतोय भविष्यासाठी 'धोकादायक संकेत' By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 1:10 PM1 / 132024 या वर्षाची सुरुवात जागतिक स्तरावर कोरोनाच्या वाढत्या धोक्याने झाली आहे. JN.1 या नवीन व्हेरिएंटमुळे संसर्गाची वाढती प्रकरणे जगभरात नोंदवली जात आहेत. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्स दाखवतात की, दीड महिन्यात हा व्हेरिएंटजवळपास 41 देशांमध्ये पसरला आहे.2 / 13सिंगापूर आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये संसर्गाच्या आणखी एका संभाव्य लाटेबाबत आरोग्य तज्ञ अलर्ट करत आहेत, तर दुसरीकडे चीनकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेथे कोरोनामुळे मृत्यूच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. म्हणजेच कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा चिंतेत वाढ होताना दिसत आहे.3 / 13भारतातील कोविड-19 च्या आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्याला असं दिसून येतं की, येथे देखील दररोज संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी संसर्गाची 774 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, दोन लोकांचा मृत्यू झाला. 4 / 13देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 4100 च्या वर आहेत. जेएन.1 व्हेरिएंट हलक्यात घेण्याची चूक होऊ नये, हा भविष्यासाठी धोकादायक संकेत देत असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 5 / 13कोरोनाचा अभ्यास करणार्या संशोधकांचे म्हणणे आहे की, लसीकरण आणि इम्युनिटीमुळे आपल्याला कोविड-19 ची सवय झाली असली तरी, आता नवीन व्हेरिएंटपासून संसर्ग आणि गंभीर आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, परंतु JN.1 चे स्वरूप पुन्हा एक भीतीदायक आहे. 6 / 13जगभरात तो ज्या वेगाने वाढत आहे, ते लक्षात घेता भविष्यासाठी धोकादायक संकेत समजून घेणं आवश्यक आहे. त्याचा प्रसार याच वेगाने होत राहिला तर त्याचे दोन गंभीर परिणाम होऊ शकतात.7 / 13पहिला, कोरोना महामारीविरुद्धचा लढा आपल्याला दीर्घकाळ सुरू ठेवावा लागेल. दुसरा म्हणजे JN.1 चा प्रसार संभाव्य धोकादायक नवीन कोरोना व्हेरिएंटसाठी अनुकूल वातावरण तयार करू शकतो.8 / 13आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 2021 च्या उत्तरार्धात कोरोनाच्या प्राणघातक डेल्टा लाटेनंतर लगेचच एक नवीन व्हेरिएंटउदयास आला, जो इतका उत्परिवर्तित होता, इतका वेगळा होता की त्याने कोरोना महामारीचा मार्ग बदलला.9 / 13वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ओमायक्रॉन हे नाव दिलं, त्यात 30 हून अधिक म्यूटेशन होते. त्यामुळे ते मूळ व्हायरसपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळे होते. हा व्हेरिएंट दोन वर्षांहून अधिक काळ सतत म्यूटेशन करत आहे आणि आता JN.1 म्हणून पाहिले जात आहे. थोडक्यात, JN.1 प्रत्येक बाबतीत गेम चेंजर ठरू शकतो. 10 / 13मीडिया रिपोर्ट्समध्ये, कॅलिफोर्नियातील स्क्रिप्स रिसर्च ट्रान्सलेशनल इन्स्टिट्यूटचे संचालक आणि कोरोना व्हायरसवर सतत संशोधन करणारे शास्त्रज्ञ डॉ. एरिक टोपोल म्हणतात, आपण लोकांना सावध केले पाहिजे की हा एक गंभीर प्रकार आहे जो जगभरात कोरोना लाटेला प्रोत्साहन देऊ शकतो. 11 / 13मिनेसोटा विद्यापीठातील सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीज रिसर्च अँड पॉलिसी (CIDRAP) चे संचालक डॉ. मायकेल ऑस्टरहोम म्हणतात की, JN.1 मुळे होणारा संसर्गाचा वेग नवीन व्हेरिएंटच्या गंभीर विकासाचे प्रतिनिधित्व करतो.12 / 13कोरोना अद्याप संपलेला नाही असे सूचित करतो. उच्च संक्रमणक्षमतेसह एक व्हेरिएंट केवळ संक्रमण वाढवत नाही, परंतु नवीन म्यूटेशनसह अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक व्हेरिएंटना देखील जन्म देऊ शकतो. 13 / 13साथीच्या रोगाच्या सुरूवातीस, अल्फा-गामा प्रकारांच्या पहिल्या लाटेमुळे सौम्य लक्षणं दिसून आली, परंतु त्याचा प्रसार खूपच जास्त होता, ज्यामुळे डेल्टा प्रकाराचा उदय झाला आणि जगभरातील मृत्यूंमध्ये झपाट्याने वाढ झाली. JN.1 प्रकाराचे जलद गतीने होणारे स्वरूपही असेच भयावह आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications