Facebook Server Down: 'ट्विटर'ला अच्छे दिन, व्हायरल झाले 'लय भारी' मिम्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 10:47 IST
1 / 17सोशल मीडिया आणि त्यातली त्यात फेसबुक, व्हॉट्असप, इंस्टाग्राम हे जणू नित्यनियमाचे जवळचे सहकारी बनले आहेत. त्यामुळे, इंटरनेट डाऊन किंवा या एपवर काहीकाळ तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास तो चर्चेचा विषय बनतो2 / 17सोमवारी रात्री सव्वानऊ वाजल्यापासून अचानक फेसबुक, इन्स्टा, Whats app डाऊन झाल्याने जगभरातील युजर्संनी झुकरबर्गच्या कंपन्यांची खिल्ली उडविण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. 3 / 17फेसबुक डाऊन झाल्यामुळे अनेकांनी ट्विटरवर आपला मोर्चा वळवला. तसेच, येथून फेसबुक, इंस्टा आणि व्हॉट्सअप बंद झाल्याचाही ट्रेंड सुरू झाला. 4 / 17या ट्रेंडनंतर मेनस्ट्रीम मीडियातही बंदच्या बातम्या झळकल्या. त्यामुळे, आता हे कधी सुरू होईल, याचीच चर्चा सगळीकडे रंगली होती. 5 / 17फेसबुक अचानक बंद पडल्याने झुकरबर्गसह या अॅपबाबतचे अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. ट्विटरवरुन या मिम्सचा ट्रेंडही सुरू झाला. 6 / 17एका फोटोमध्ये तर वायरींच्या जंजाळामध्ये मार्क झकरबर्ग घुसून समस्या शोधत असल्याचे दाखविण्यात आले आहे. 7 / 17 फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टा गेल्या दोन तासांपासून बंद पडले आहे. एवढा वेळ बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 8 / 17या आधीही काही काळासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप बंद झाले होते. परंतू हा काळ अर्धा किंवा तासभर एवढाच होता. परंतू यावेळी तब्बल सहा तासानंतर फेसबुक सूरू झालंय. 9 / 17फेसबुक बंद झाल्यामुळे मार्क झुकरबर्गची होणारी धडपड या फोटोतून सांगण्याचा प्रयत्न केलाय.10 / 17अजय देवगणचा गोलमाल चित्रपटातील हा एटीट्यूड लूक सध्या ट्विटरचा असल्याचं मिम्स नेटवर व्हायरल झालं होतं11 / 17किती वाट पहायची रे फेसबुक सुरू व्हायची, कंटाळ आलाय आता, उभं राहून, बसलो आता लोटलो, असंच हे मिम्स सांगत आहे12 / 17फेसबुक बंदमुळे ट्विटरला अच्छे दिन आले, नेटीझन्स सगळे ट्विटरकडेच वळाले13 / 17अमरिष पुरी यांना मार्क झुकरबर्ग बनवून हे मिम्स बनविण्यात आलंय, किती वेळ घेतला तुम्ही परत येण्यासाठी असं सांगायचंय या फोटोतून14 / 17फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअपला तडा गेला, आता ट्विटरच रुबाबात दिसला15 / 17विशेष म्हणजे या डाऊनच्या काळात टेलिग्रामही सुरू असल्यानं अनेकांनी टेलिग्रामवरुन कनेक्टीव्हीटी साधली, टेलिग्राम लय भारी असंही काहींनी म्हटलं16 / 17रात्री सव्वा नऊच्या सुमारास फेसबुक डाऊन झाल्यामुळं गावच्या मंडळींचा रुबाब पाहण्यासारखा होता, अंतिम सत्य हेच.. असंच त्यांना सांगायचंय.17 / 17मार्क झुकरबर्गचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला, हे मिम्स आज सकाळी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये येऊन पडले होते, तोपर्यंत सगळं पुन्हा कार्यरत झालं.