Family members take dead man to hospital after he swallows water
अंत्यसंस्कारावेळी मृत व्यक्तीनं पाणी गिळलं, कुटुंबीयांनी रुग्णालयात नेलं अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 7:57 PM1 / 10अंत्यसंस्कारावेळी मृत व्यक्तीनं पाणी गिळल्याचा प्रकार कर्नाटकच्या हुबळीमध्ये घडला. शुक्रवारी घडलेल्या या घटनेची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.2 / 10हुबळीत राहणारे इराण्णा कांबळे यांचं हदयक्रिया बंद पडल्यानं निधन झालं. त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते.3 / 10शुक्रवारी इराण्णा कांबळे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे कुटुंबावर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.4 / 10कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करताना त्यांना अंघोळ घालण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मुखात घातलेलं पाणी ते गिळत असल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं.5 / 10इराण्णा यांना केआयएमएस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. मात्र अंत्यसंस्कारावेळी पाणी गिळत नसल्याचं ते जिवंत असावेत, असं त्यांच्या कुटुंबीयांना वाटलं. 6 / 10कुटुंबीय आणि नातेवाईकांनी तातडीनं जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. अंत्यसंस्कारावेळी पाणी गिळल्यानं कुटुंबीयांना डॉक्टर काहीतरी सकारात्मक माहिती देतील, अशी आशा होती.7 / 10जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी इराण्णा यांना तपासून ते मृत असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबीयांनी इराण्णा यांचं पार्थिव घेऊन गाव गाठलं. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.8 / 10काही दिवसांपूर्वीच असाच एक प्रकार घडला होता. एक व्यक्ती मृत पावल्याचं त्याच्या मित्रांना वाटत होतं. त्यामुळे मृताशेजारी असलेले मित्र शोकमग्न होते. 9 / 10त्यावेळी एका स्थानिक छायाचित्रकाराला मृताच्या तोंडून आवाज ऐकू आला. त्यामुळे छायाचित्रकार मृतदेहाच्या जवळ गेला. तरीही आवाज ऐकू येत होता.10 / 10छायाचित्रकारानं याची माहिती इतरांना दिली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात नेलं. त्यानंतर संबंधित व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं. आणखी वाचा Subscribe to Notifications