शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेतकऱ्याची सहाव्यांदा लागली लॉटरी, खोदकामात सापडला 6.47 कॅरेटचा मौल्यवान हिरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 7:48 PM

1 / 8
पन्ना:मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात एका शेतकऱ्याला सरकारकडून लीजवर घेतलेल्या जमिनीच्या उत्खननात उच्च दर्जाचा 6.47 कॅरेट हिरा सापडला आहे. या शेतकऱ्याला गेल्या दोन वर्षात उत्खननात सहाव्यांदा हिरा मिळालाय.
2 / 8
जिल्ह्याचे प्रभारी हिरा अधिकारी नूतन जैन यांनी शनिवारी सांगितले की, प्रकाश मजुमदार नावाच्या व्यक्तीला शुक्रवारी जरुआपूर गावातील खाणीत हा हिरा मिळाला.
3 / 8
6.47 कॅरेटचा हिरा आगामी लिलावात विक्रीसाठी ठेवला जाईल आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार किंमत निश्चित केली जाईल.
4 / 8
याबाबत प्रकाश मजुमदार म्हणाले की, लिलावातून मिळालेली रक्कम खाणीतील कामात असलेल्या त्यांच्या चार भागीदारांसोबत वाटून घेणार आहेत. एका अंदाजानुसार, लिलावात 6.47 कॅरेटच्या हिऱ्याची किंमत सुमारे 30 लाख रुपये असू शकते.
5 / 8
त्यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले, 'आम्ही पाच भागीदार आहोत. आम्हाला 6.47 कॅरेटचा हिरा सापडला आहे. हिरा आम्ही सरकारी हिरे कार्यालयात जमा केलाय. यापूर्वीही आम्हाला, दोन ते अडीच कॅरेटचे चार मौल्यवान हिरे दोन वर्षांत खाणकाम करताना सापडले आहेत.
6 / 8
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कच्चा हिऱ्याचा लिलाव केला जाईल आणि त्यातून मिळणारी रक्कम सरकारी रॉयल्टी आणि कर कापल्यानंतर शेतकऱ्याला दिली जाईल.
7 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशात असलेल्या पन्ना जिल्ह्यात अंदाजे 12 लाख कॅरेटचा हिऱ्यांचा साठा आहे.
8 / 8
राज्य सरकार हिरे खाणीसाठी पन्ना हिरे राखीव क्षेत्रातील स्थानिक शेतकरी आणि मजुरांना जमिनीचे छोटे तुकडे भाड्याने देते. शेतकरी किंवा कामगार खाणीत मिळवलेले हिरे जिल्हा हिरा अधिकाऱ्याकडे जमा करतात.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश