FASTag Will Be Must For All Cars From 15 December 2019; Otherwise double charge for toll
उद्यापासून चारचाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक; अन्यथा टोलसाठी मोजावे लागणार दुप्पट पैसे By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 9:47 AM1 / 5राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे टोल नाक्यांवर अनेक वेळा रांगेत तिष्ठत राहावे लागते. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ वाया जातो, ते टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाहनधारकांसाठी ‘फास्ट टॅग’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.2 / 5आठवड्याच्या शेवटी लांब सुट्ट्या असल्यामुळे अनेकजण बाहेर फिरायला जाण्याच्या तयारीत आहे. मात्र रोड वाहतुकीसाठी टोल बूथशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे, फास्ट टॅग नसलेल्या व्यक्तीला फास्ट टॅगसाठीच्या मार्गावरून जायचे असल्यास दुप्पट पथकर मोजावे लागेल. १५ डिसेंबरपासून हे बंधनकारक करण्यात आले आहे. 3 / 5‘फास्ट टॅग’ कसे खरेदी कसे करावे? फास्टॅग 22 अधिकृत बँकांकडून पॉईंट ऑफ सेल (पीओएस) सारख्या विविध चॅनेलमधून ऑफलाइन खरेदी करता येईल. टोल प्लाझा व राष्ट्रीय महामार्गावरील निवडक बँक शाखा येथे त्यांची विक्री केली जात आहे. हे Amazon सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत.4 / 5पेटीएमवरून ‘फास्ट टॅग’ खरेदी व रिचार्ज कसे करावे? पेटीएम ‘फास्ट टॅग’ हा पुन्हा वापरण्यायोग्य टॅग आहे. हे केवळ आरएफआयडी तंत्रज्ञानावर कार्य करते. ‘फास्ट टॅग’ आपल्या पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात आणि पेटीएम वॉलेटशी जोडला जाऊ शकतो. पण आपल्या पेटीएम वॉलेटमध्ये पुरेसे पैसे असणे महत्वाचे आहे5 / 5किती रुपयात 'फास्ट टॅग’ मिळेल? सामान्य लोकांच्या मनात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा 'फास्ट टॅग’ खरेदी करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील. उत्तर स्पष्ट आणि सोपे आहे. फास्टॅग जारी करण्यासाठी अधिकृत बँका किमान 100 रुपये आकारू शकतात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) निर्णय घेतला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications