शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: ...तर 'या' दिवशी देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या घरात असेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 2:44 PM

1 / 12
देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास ११ हजारानं वाढली.
2 / 12
एका दिवसात प्रथमच कोरोना रुग्णांच्या संख्येत इतकी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे भारतानं ब्रिटनला मागे टाकलं.
3 / 12
कोरोना रुग्णांच्या बाबतीत आता भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या अमेरिका, रशिया आणि ब्राझील हे तीनच देश भारतापुढे आहेत.
4 / 12
भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. रुग्णवाढीचा हाच वेग कायम राहिल्यास २५ ते ३० ऑगस्ट दरम्यान भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असेल. त्यावेळी ब्राझील पहिल्या स्थानी असेल.
5 / 12
ब्राझीलमधील कोरोना वाढीचा वेग असाच राहिल्यास २५ जुलैपर्यंत अमेरिका मागे जाईल. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या पहिल्या ६ देशांचा विचार केल्यास भारतातील रुग्ण वाढीचा दर सर्वाधिक आहे.
6 / 12
भारतातील कोरोना रुग्णांचं प्रमाण ४.३० टक्के वेगानं वाढत आहे. या यादीत ब्राझील (४.२६ टक्के) दुसऱ्या स्थानी आहे. तर रुग्ण वाढीचा सर्वात कमी दर स्पेनमध्ये (०.१० टक्के) आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ही आकडेवारी दिली आहे.
7 / 12
रुग्ण दुपटीचा वेग पाहिल्यास त्यात ब्राझील पहिल्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची संख्या अवघ्या १६ दिवसांत दुप्पट होत आहे. हाच वेग कायम राहिल्यास पुढील ६४ दिवसांत म्हणजेच १४ ऑगस्टपर्यंत ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या पुढे जाईल.
8 / 12
भारतातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग १७ दिवस आहे. रुग्णसंख्या याच वेगानं दुप्पट होत राहिल्यास १०२ दिवसांत म्हणजेच २१ सप्टेंबरपर्यंत भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटींच्या पुढे जाईल.
9 / 12
रुग्ण दुपटीचा सर्वात कमी वेग स्पेनमध्ये आहे. स्पेनमधील कोरोना रुग्णांचा आकडा १ कोटींच्या घरात जायला ४०८ दिवस लागतील.
10 / 12
भारतानं आतापर्यंत ५२ लाख ३२ हजार २४५ जणांच्या कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. यातील ५.९ टक्के जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.
11 / 12
कोरोना चाचण्यांच्या बाबतीत अमेरिका सर्वात पुढे आहे. अमेरिकेत आतापर्यंत २ कोटी २६ लाख ९० हजार ७६५ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातील ९.२३ टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
12 / 12
ब्राझीलची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. ब्राझीलमध्ये १२ लाख ६४ हजार ७८० जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातील ७ लाख ८० हजार ७६५ जण म्हणजेच ७४.२२ टक्के नागरिक कोरोना बाधित आढळून आले आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या