favivir favipiravir cheapest medicine for covid 19 hetero drugs launched in india
कोरोनावर मात करणारं स्वस्त औषध भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत... By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 3:50 PM1 / 10देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या चिंताजनक आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. फक्त 12 दिवसांत कोरोनाचे तब्बल 5 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. 2 / 10ब्लूमबर्ग कोरोना व्हायरस ट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी 20 टक्क्यांनी अधिक वाढ झाली आहे. देशातील रुग्णसंख्येने 15 लाखांचा टप्पा पार केला असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 3 / 10भारतात जानेवारीमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णांची संख्या पाच लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 148 दिवस लागले. मात्र त्यानंतर कमी दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे. 4 / 10दरम्यान, भारतातील कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वात स्वस्त औषध लाँच करण्यात आले आहे. या औषधाला काही दिवसांपूर्वी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) मंजुरी मिळाली आहे. 5 / 10या औषधाची निर्मिती करणाऱ्या हेटरो ड्रग्स (Hetero Drugs) कंपनीने दावा केला आहे की, हे कोरोनावरील स्वस्त औषध आहे. या औषधाची एक टॅबलेट अवघ्या 59 रुपयांत मिळणार आहे.6 / 10हैदराबादस्थित औषधनिर्माण कंपनी हेटरो ड्रग्सने सांगितले की, या औषधाचे ब्रँड नेम फॅविव्हिर (Favivir) असणार आहे. हे एक जेनेरिक अँटीरेट्रोव्हायरल औषध आहे. याला फॅवीपीरावीर म्हणून देखील ओळखले जाते. यापूर्वी कंपनीने कोविफोर या ब्रँड नावाने रेमडेसिवीर औषध सुरू केले होते.7 / 10फॅविव्हिर 200 मिलीग्राम टॅब्लेटमध्ये येईल. एका टॅब्लेटची किंमत 59 रुपये असेल. ही किंमत जास्तीत जास्त किरकोळ किंमत असेल. हे औषध जास्त किंमतीला विकले जाणार नाही. 8 / 10हे औषध देशातील प्रत्येक कोरोना रूग्णाला मिळावे, असे या कंपनीला वाटते. हे औषध आम्ही प्रत्येक कोविड सेंटरपर्यंत पोहोचवू. आमच्या औषधाची किंमत देखील निश्चित केली आहे. हे एक स्वस्त औषध आहे, असे कंपनीने म्हटले आहे.9 / 10सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाला फॅविव्हिर औषधाची आवश्यकता आहे. कोरोनाच्या सौम्य किंवा मध्यम संसर्ग असलेल्या रुग्णांसाठी हे औषध सर्वोत्कृष्ट आहे, असे कंपनीने म्हटले आहे.10 / 10कोरोनाव्हायरसच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात भारतात फॅविव्हिर डीसीजीआयने मान्यता दिली होती. आता ते बाजारात आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications