Fear of snowfall, avalanches and landslides in Himachal Pradesh
हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी, हिमस्खलन आणि भूस्खलनाची भीती By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 3:29 PM1 / 6हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होत असल्यानं वातावरण बिघडलेलं आहे. दोन दिवस सूर्य दिसल्यानंतरही वातावरणात सुधारणा झालेली नाही. 2 / 6. शिमल्यातही हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत. हवामान विभागानं पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. 3 / 6तसेच हिमस्खलनाचीही सूचना दिली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यानं हिमस्खलन आणि भू-स्खलन यांसारख्या घटना होण्याची भीती वाढली आहे. 4 / 6गेल्या दोन दिवसांपासून हिमाचल प्रदेशमधलं वातावरण ढगाळ आहे. 5 / 6त्यामुळे हिमस्खलन आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. लाहोलच्या हिमस्खलनानं एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला आहे. 6 / 6जिल्हा प्रशासन वारंवार लोकांना सावधानीनं प्रवास करण्याच्या सूचना करत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications