Fight with Coronavirus: Home, Office sanitization by yourself; Quite simple hrb
कोरोनाशी लढा : घर, ऑफिस तुम्हीच निर्जंतूक करा; एकदम सोपे By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 11:25 AM1 / 11जगभरात कोरोनाने चांगलाच कहर माजविला आहे. यामुळे अनेक देशांमध्ये शटडाऊन करावे लागले आहे. भारतातही कोरोनाने दुसरा टप्पा गाठला असून या भयंकर व्हायरसला रोखण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. 2 / 11अनेक ठिकाणी सरकारी कार्यालये, बस, टॅक्सी, लोकल ट्रेन सॅनिटाईज म्हणजेच निर्जंतूक करण्यात येत आहेत. यासाठी फार काही करण्याची गरज नाही. तुम्हीही तुमचे घर, ऑफिस निर्जंतूक करू शकता. 3 / 11आज प्रत्येकाच्या घरामध्ये फरशी चमकविणारे फिनाईल असतेच. त्यासारखेच अन्य काही घटक मिक्स केल्यास तुम्हीही सॅनिटायझरचा फवारा घरभर करू शकता. 4 / 11आज प्रत्येकाच्या घरामध्ये फरशी चमकविणारे फिनाईल असतेच. त्यासारखेच अन्य काही घटक मिक्स केल्यास तुम्हीही सॅनिटायझरचा फवारा घरभर करू शकता. 5 / 11बाजारात कार्बोलिक अँसिड मिळते. यासोबत सोडियम हायपो क्लोराईडही मिळते. 6 / 11ही दोन्ही रसायने केमिकल सर्जिकल वस्तू मिळणाऱ्या दुकानात उपलब्ध आहेत. यांची किंमतही जवळपास फिनाईल सारखीच आहे.7 / 11या दोन केमिकलचा योग्य मात्रा घेऊन फवारा केल्यास त्याची तीव्रता दिवसभर राहते. म्हमजेच तुमचे घर, ऑफिस दिवसभर निर्जंतूक राहते. हे करण्याची प्रक्रिया काही कठीण नाही. 8 / 11घर आणि ऑफिसमध्ये फिनाईल पाण्यामध्ये टाकून त्याने फरशी साफ केली जाते. पण आता ही फरशी सॅनिटाईज करण्यासाठी सोडिअम हायपोक्लोराईड वापरा. एक ग्लास सोडिअम हायपोक्लोराईड घेतल्यास त्याच्या चौपट पाणी मिक्स करा. आणि फरशी पुसा. 9 / 11ज्या वस्तूंना तुम्ही हात लावणार आहात, उदा. फर्निचर, दरवाजे, खिडकी आदींसाठी कार्बोलिक ऍसिड वापरा. या वस्तू या ऍसिडने निर्जंतूक करता येतात. 10 / 11यासाठी एक ग्लास कार्बोलिक ऍसिड वापरल्यास त्याच्या तिप्पट पाणी मिक्स करावे. हे वापरण्यासाठी स्प्रे गन किंवा स्प्रे करणारी बॉटल वापरावी. स्प्रे मशीन नसल्यास कपडा भिजवून तुम्ही निर्जंतुकीकरण करू शकता. 11 / 11घर. ऑफिस निर्जंतूक करण्यासाठी बाहेरून कामगार येतात. पण त्यांच्या खर्च परवडणारा नाही. यामुळे कमी खर्चात तुम्ही या दोन केमिकलद्वारे घर निर्जंतूक करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications