Final analysis of Covaxin efficacy out; vaccine 65.2% effective against Delta variant, 77.8 overall
Covaxin घेतली असेल तर चिंता सोडा; भारत बायोटेककडून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम जाहीर By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 11:53 AM1 / 10स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन (Covaxin Vaccine) च्या तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच अंतिम टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत. याचसोबत कंपनीने या चाचणीचे निकालही जाहीर केले आहेत. (Bharat Biotech concludes final analysis for Covaxin efficacy as part of phase 3 clinical trials, after evaluation of 130 confirmed cases.)2 / 10यामध्ये ही कोरोना लस गंभीर रुग्ण आणि डेल्टा व्हेरिअंटची लागणा झालेल्या रुग्णांवर परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. (Covaxin's efficacy demonstrated at 77.8% against symptomatic COVID19 patients)3 / 10भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील आकडेवारीच्या आधारे सांगितले की, कोव्हॅक्सिन सरासरी ७७.८ टक्के प्रभावी आहे. 4 / 10जगभरात दहशत फैलावणाऱ्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात देखील ही लस 65.2% टक्के परिणामकारक आढळली आहे. 5 / 10कोरोनाचे गंभीर संक्रमण झालेल्यांना वाचविण्यात कोव्हॅक्सिन 93.4% प्रभावी ठरली आहे.6 / 10कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर ही कोव्हॅक्सिन लस 63.6% प्रभावी ठरली आहे. 7 / 10तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांवरून असे आढळले आहे की, ही लस सरासरी 77.8% परिणामकारक आढळली आहे. 8 / 10कोव्हॅक्सिन ६० वर्षांवरील नागरिकांसाठी 67.8% आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी 79.4% प्रभावी ठरली आहे. या टप्प्यातील लस घेणाऱ्या ९९ नागरिकांमध्ये गंभीर साइड इफ़ेक्ट्स दिसून आले. 9 / 10Asymptomatic केस: 63% प्रभावी, डेल्टा व्हेरिएंट: 65% प्रभावी, कमी-मध्यम आणि गंभीर लागण झालेल्यांवर 78% प्रभावी. 10 / 10कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील परिणाम हा 130 कोरोना रुग्णांवर चाचण्या घेऊन जाहीर केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications