1 / 7अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला वांगमयीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. बंगळुरूतील एका हॉटेलमध्ये या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अत्यंत साध्या पद्धतीनं हा सोहळा पार पडला. 2 / 7या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी सहभागी झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परकला वांगमयी आणि प्रतीकच्या या लग्नात कोणत्याही राजकीय पाहुण्याला आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. निर्मला सीतारामन यांच्या मुलीचा विवाह हिंदू परंपरेनुसार उडुपी अदामारू मठाच्या संतांच्या आशीर्वादानं पार पडला.3 / 7अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मुलीच्या लग्नाचे फोटो अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही युजर्सनी या लग्नाचा व्हिडीओही शेअर केला आहे. 4 / 7व्हिडीओमध्ये अत्यंत साध्या पद्धतीनं हा सोहळा पार पडताना दिसतोय. तसंच त्या ठिकाणी निर्मला सीतारामन उपस्थित असून वैदिक मंत्रोच्चारही ऐकू येत आहेत.5 / 7अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला वांगमयी या व्यवसायानं पत्रकार आहेत. वांगमयी यांनी मॅसॅच्युसेट्समधील बोस्टन येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेत मास्टर्स केलंय. 6 / 7याशिवाय त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्याचंही शिक्षण पूर्ण केलंय. त्यांनी द हिंदू, लाइव्ह मिंट आणि द व्हॉईस ऑफ फॅशन या मीडिया कंपन्यांमध्ये काम केलंय.7 / 7याआधी, सप्टेंबर २०१९ मध्ये निर्मला सीतारामन यांनी डॉटर्स डेनिमित्त परकला यांच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला होता. त्यात त्यांचं वर्णन वर्णन एक मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून केलं होतं.