The first branch of PNB, which was opened in Pakistan, was eaten by Mahatma Gandhi
पीएनबीचा इतिहास 122 वर्षं जुना, महात्मा गांधींचंही होतं खातं By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 6:01 PM1 / 7पंजाब नॅशनल बँकेचा इतिहास भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणारा राहिला असून, हा इतिहास 122 वर्षं जुना आहे.2 / 7या बँकेची सुरुवात करण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी लाला लजपत राय यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. 3 / 7त्यावेळी लाल लजपत राय यांच्याबरोबर स्वातंत्र्याच्या अभियानाशी जोडले गेलेले दयाल सिंह मजिठिया, पंजाबचे पहिलं उद्योगपती लाला हरकिशन लाल, काली प्रसन्न रॉय, पारशी उद्योगपती ईसी जेस्सावाला, मूल्तानचे राजे प्रभू दयाल, जयशी राम बक्षी आणि लाला डोलन दास यांनी बँकेची पायाभरणी केली.4 / 7 बँक पूर्णतः भारतीय चलनावर सुरू झाली होती. त्यावेळी 14 मूळ शेअर्स होल्डर आणि 7 संचालकांनी फारच कमी शेअर्स घेतले. 5 / 7या बँकेत महात्मा गांधींसह लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, जालियन वाला बाग कमिटीचंही बचत खातं होतं.6 / 7पंजाब नॅशनल बँकेचं राष्ट्रीयीकरण 1969मध्ये इतर बँकांसोबत झालं होतं. 7 / 7देशात पंजाब नॅशनल बँकेच्या 6947 शाखा आहेत. तसेच 9753 एवढं एटीएम सेंटर आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications