Green Fungus : बापरे! ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगसनंतर आता 'ग्रीन फंगस'; देशात पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 11:04 AM1 / 18कोरोनाच्या संकटात थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट झालेली पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 2,96,33,105 वर पोहोचला आहे.2 / 18देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 62,224 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2542 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,79,573 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 3 / 18कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशात कहर पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत.4 / 18काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत.5 / 18ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगसनंतर आता ग्रीन फंगस देखीस समोर आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका 33 वर्षीय रुग्णाला ग्रीन फंगसची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 6 / 18मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण आढळला आहे. रुग्णाच्या फुफ्फुसांची चाचणी केली असता हा प्रकार समोर आला. देशातील ग्रीन फंगसचं हे पहिलंच प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे. 7 / 18रुग्णाची चाचणी केल्यानंतर त्याला उपचारासाठी मध्य प्रदेशहून मुंबईमध्ये हलवण्यात आले आहे. मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्याला शिफ्ट करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 8 / 18आरोग्य विभागाच्या अधिकारी अपूर्वा तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांच्या फुफ्फुसांची चाचणी केली असता त्यामध्ये ग्रीन कलरचा एक फंगस दिसला. त्यामुळे रंगाच्या आधारे ग्रीन फंगस असं नाव देण्यात आलं आहे. 9 / 18देशातील विविध राज्यांत ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगसचे अनेक रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. याच दरम्यान आता देशात पहिल्यांदाच ग्रीन फंगस आढळून आला आहे. 10 / 1833 वर्षीय रुग्ण कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्याच्यामध्ये पोस्ट कोविड लक्षणं आढळून आली. दीड महिन्यांआधी पहिल्यांदा त्याला उपचारासाठी अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले.11 / 18रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू होते. मात्र तरी देखील त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. 103 डिग्री ताप येत होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी चार्टर्ड प्लेनने मुंबईत पाठवण्यात आलं आहे. 12 / 18मध्य प्रदेशच्या इंदूरमधील एमवाय रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 'म्यूकोरमायसिस' हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत.13 / 18ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचार केले जात असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपचारासाठी वापरण्यात आलेल्या इंजेक्शनचा वाईट परिणाम होत असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.14 / 18मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 27 रुग्णांना अँफोटेरिसिन-बी (Amphotericin-B) इंजेक्शन दिल्यानंतर याचे गंभीर दुष्परिमाण दिसू लागले आहेत. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळे याचा वापर थांबवण्यात आला आहे.15 / 18मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. जवळपास 42 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या उपचारासाठी दोन दिवसांपूर्वीच जवळपास 350 अँफोटेरिसिन-बी इंजेक्शन पाठवण्यात आले.16 / 18ब्लॅक फंगस रुग्णांमध्ये अँम्फोटेरिसीन बी इंजेक्शनचे भयंकर असे दुष्परिणाम दिसून आले आहेत. हे इंजेक्शन दिल्यानंतर थंडी, ताप, उलटीची समस्या उद्भवू लागली. इंदोर, सागर आणि जबपूरमध्ये इंजेक्शनचे असे गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत.17 / 1842 पैकी 27 रुग्णांना शनिवारी अँफोटेरिसिन-बी इंजेक्शन देण्यात आलं. मात्र त्यानंतर गंभीर दुष्परिणाम दिसून आला आहे. काहींना खूप ताप आला. तसेच त्यांचे अंग थरथर कापू लागले. अचानक थंडी वाजू लागली आणि उलट्या देखील झाल्या आहेत.18 / 18रुग्णांवर या इंजेक्शनचा दुष्परिणाम दिसून येताच हे औषध देणं थांबवण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की रुग्णांवर इंजेक्शनचं रिएक्शन दिसून येत आहे. आता त्यांना इंजेक्शनऐवजी दुसरं औषध दिलं जात आहे अशी माहिती दिली. आणखी वाचा Subscribe to Notifications