The first human trial of corona vaccine begins in India
कोरोना लसीची पहिली मानवी ट्रायल सुरू, 2 दिवसात 8 जणांना दिला डोस By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 10:11 PM1 / 11 देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. देशात सध्याच्या घडीला दर दिवशी ३० हजारांहून जास्त रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. 2 / 11देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील वाढत आहे. 3 / 11 Covid19india.org या संकेतस्थळानुसार, देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६३.२५ टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे.4 / 11 कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या रोगोावर लस कधी येणार, याचीच चिंता सर्वांना लागली आहे. या सर्व नागरिकांसाठी खुशखबरी आहे. 5 / 11बिहारच्या पाटना येथील एम्स रुग्णालयात कोविड 19 लसीची चाचणी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे मानवी जीवावर याची ट्रायल सुरू करण्यात आली आहे. 6 / 11 येथील एम्स रुग्णालयात गेल्या 2 दिवसांत 8 जणांना या लसीची चाचणी देण्यात आली आहे. एम्सचे प्रबंधक प्रभातकुमार सिंह यांनी संदर्भात माहिती दिली.7 / 11 पहिल्या टप्प्यात सुरुवातीला 18 जणांना या लसीचा डोस देण्यात आला असून त्याचा अहवाल तब्बल तीन महिन्यांनी येणार आहे.8 / 11 या लसीची ट्रायल चाचणी 54 जणांवर करण्यात येणार आहे, असेही सिंह यांनी म्हटले9 / 11 कोरोनाच्या लसीची देशातील ही पहिलीच मानव ट्रायल आहे, पाटणा एम्समधून याची सुरुवात झाली आहे. 10 / 11 हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने या लसीची निर्मित्तीक केली असून पाटणा एम्ससह देशातील 12 वैद्यकीय संस्थामध्ये ही मानव ट्रायल होणार आहे11 / 11दरम्यान, देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६३.२५ टक्क्यांवर गेलं आहे. बहुतांश कोरोना रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून येतात. आणखी वाचा Subscribe to Notifications