First private train service flagged off from Coimbatore to return to Shirdi on Sunday
PHOTOS: देशातील पहिली खासगी ट्रेन शिर्डीत येणार, ट्रेनमध्ये काय काय मिळणार? पाहा... By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:45 PM1 / 8भारत गौरव या योजनेअंतर्गत पहिल्या खासगी रेल्वेगाडीचे उदघाटन करण्यात आले. ही पहिली खासगी रेल्वे कोईम्बतूक ते शिर्डी या दरम्यान धावणार आहे. त्या निमित्ताने या पहिल्या खासगी रेल्वेची माहिती...2 / 8योजनेअंतर्गत खासगी आणि पर्यटन कंपन्या रेल्वेकडून भाडेतत्वावर गाड्या घेऊ शकणार आहेत. भारतीय रेल्वेकडून भाडेतत्वावर घेतलेल्या या गाड्या कोणत्या मार्घावर चालवायच्या, भाडे किती आकारायचे आणि सेवा कोणत्या द्यायच्या इत्यादींचा निर्णय कंपन्या घेऊ शकतात. 3 / 8खासगी आणि पर्यटन कंपन्यांना रेल्वेगाडी भाडेतत्वावर देताना प्रवाशांची लुबाडणूक होणार नाही, याची खात्री भारतीय रेल्वेने केलेली असते. 4 / 8भारतीय रेल्वेचीच ही योजना आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. 5 / 8भारत गौरव योजनेअंतर्गत कोईम्बतूर ते शिर्डी ही पहिली रेल्वेगाडी धावली. या गाडीला २० डबे जोडण्यात आले आहेत. 6 / 8प्रथम, द्वितील आणि तृतीय इत्यादी श्रेणींचे वातानुकूलित डबे. त्याचबरोबर स्लीपर कोचचे डबे या गाडीला आहेत. 7 / 8ट्रेन कॅप्टनच्या हाती गाडीची सूत्रे असतील. तसेच एक डॉक्टर, खासगी सुरक्षा रक्षक हेही गाडीमध्ये तैनात असतील. प्रवाशांना शाकाहारी भोजन दिले जाईल. दर एक तासाने स्वच्छता कर्मचारी गाडी स्वच्छ करत जातील. 8 / 8कोईम्बतूर येथून सायंकाळी सहा वाजता गाडी शिर्डीसाठी रवाना होईल. वाटेत तिरुपूर, इरोड, सालेम जोरापेट, बंगळुरू येलहांका, धर्मावारा, मंत्रालयम रोड आणि वाडी या स्थानकांवर गाडी थांबेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता गाडी शिर्डीला पोहोचेल. आणखी वाचा Subscribe to Notifications